शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्यानेच मित्राच्या मदतीने केला खून

By admin | Updated: July 8, 2017 02:07 IST

यवतमध्ये पाच दिवसांपूर्वी झालेला खून मृताच्या पुतण्याने त्याच्या एका मित्राच्या सहकार्याने असल्याचे यवत पोलिसांनी उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवत : यवतमध्ये पाच दिवसांपूर्वी झालेला खून मृताच्या पुतण्याने त्याच्या एका मित्राच्या सहकार्याने असल्याचे यवत पोलिसांनी उघडकीस आणले आहे. महावीर स्टील इंडस्ट्रीज कंपनीच्या पाठीमागील असलेल्या माळरानावरील निर्जन स्थळी तरुणाची धारदार हत्याराने डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमधील आरोपींना आज सायंकाळी उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपी मृताचा पुतण्या अमोल हरिदास थोरात (वय २९, रा. खुटबाव, ता. दौंड) व गणेश ब्रिजमोहन चौरसिया (रा. भांडगाव, ता. दौंड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भानुदास गोविंद थोरात (वय २५, रा. मटकाळावस्ती, खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे) असे धारदार हत्याराने हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून झालेल्या भानुदास थोरात यांच्यावर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याने त्या गुन्ह्यांच्या संबंधित कोणीतरी खून केला असेल, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना वाटत होता. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी भेट दिली होती. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे व पथकाने खुनाचा तपास वेगाने सुरू केला होता. प्राथमिक अंदाज वाटणाऱ्या आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन तपास केला, मात्र हा खून त्यांनी केला नसल्याचे समोर आल्यानंतर संशयितांना सोडून देण्यात आले होते. मागील चार दिवसांत खुनाचे आरोपी पोलिसांना मिळाले नव्हते, मात्र आज पोलिसांनी वेगळ्या अंगाने याचा तपास केला असता पुतण्या अमोल हरिदास थोरात याने खून केल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्याला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. खुनाचे कारण अस्पष्टयवत मध्ये झालेला खून पुतण्याने केला असल्याची कबुली पोलिसांकडे दिल्यानंतर खून कोणी केला याचे गूढ उलगडले असले तरी खुन नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे पोलिसांच्या पुढील तपासात निष्पन्न होईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.