शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बोपोडीत दुकानदाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:15 IST

पुणे : पैशाच्या वादातून बोपोडीत एका चिकन दुकानदाराचा टोळीने कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. रणजित ऊर्फ माँटी सुगंधर ...

पुणे : पैशाच्या वादातून बोपोडीत एका चिकन दुकानदाराचा टोळीने कोयत्याने वार करून निर्घृण खून केला.

रणजित ऊर्फ माँटी सुगंधर परदेशी (वय ३२, रा. भाऊ पाटील रोड, बोपोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

याबाबत खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी सांगितले की, माँटी याचे बोपोडीत चिकनचे दुकान आहे. त्याने यातील एका अल्पवयीन मुलाकडून उसने पैसे घेतले होते. हे पैसे माँटी परत देत नव्हता. या रागातून या अल्पवयीन मुलाने इतर चौघांच्या मदतीने हे कृत्य केले. बोपोडी परिसरात मेट्रोचे काम सुरु असलेल्या ठिकाणी या अल्पवयीन मुलाने माँटी याला बोलावले. त्यानुसार शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास माँटी तेथे गेला होता. यावेळी पैसे परत देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी या टोळक्याने माँटीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.