शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वाल्हेकरवाडी महाराजाकडून व्यावसायिकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे/धनकवडी : वाल्हेकरवाडी मठाधिपती महाराजानेच आकुर्डीतील एका व्यावसायिकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. खून केल्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे/धनकवडी : वाल्हेकरवाडी मठाधिपती महाराजानेच आकुर्डीतील एका व्यावसायिकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कात्रज घाटात टाकून अपघाताचा बनाव केला. मात्र, भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून महाराजाचा कट उघडकीस आणला आहे.

याप्रकरणी महाराजासह चौघांना बेड्या ठोकल्या. महाराज रमेश कुंभार, तसेच मठात काम करणारे योगेश निकम, अमोल बडगम आणि व्यावसायिकाची पत्नी सरोज गुजर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महाराज रमेश कुंभार याचा वाल्हेकरवाडीत शिवगोरक्ष नावाने मठ आहे. आनंद गुजर (वय ४४, रा. आकुर्डी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांना शनिवारी सकाळी नागरिकांनी फोन करून कात्रज येथील नव्या बोगद्याजवळील हॉटेल मराठी शाहीसमोर एक मृतदेह पडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर तेथे एकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्याजवळच एक दुचाकी पोलिसांना मिळाली. तिचा नंबर तपासला असता तो बनावट आढळून आला. पोलिसांनी चॅसी नंबरवरून गाडी मालकाचा शोध लावला. ही गाडी आनंद गुजर याची असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांच्या तपासाला वेग आला.

पोलिसांनी केलेल्या तपासात गुजर यांची पत्नी गेल्या ६ महिन्यांपासून वाल्हेकरवाडीतील मठात रहात असल्याचे आढळून आले. आनंद गुजर याच्या पत्नीच्या नावावर आयडिया कंपनीची एजन्सी आहे. तिने महाराजांना एक ब्रिझा कारही भेट दिली आहे. आनंद गुजर याचाही व्यवसाय होता. लॉकडाऊन झाल्यापासून तो बंद पडला आहे. पोलिसांनी मठातील सर्वांकडे चौकशीला सुरुवात केली. त्यातून हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. आनंद गुजर हा शुक्रवारी सायंकाळी मठामध्ये गेला होता. तेथे त्याची पत्नी व महाराजांबरोबर जोरदार भांडणे झाली. या भांडणात महाराज, पत्नी व महाराजांच्या सेवेकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आनंद याचा मृत्यू झाला. त्यामुळे ते सर्व गडबडून गेले. आनंद याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट महाराजाने आखला. त्याचा मृतदेह मोटारीत टाकला. आनंद याच्या दुचाकीचा नंबर बदलून ती घेऊन एक भक्त मोटारीबरोबर दुचाकीवरून कात्रज घाटात आला. त्यांनी आनंद याचा मृतदेह कात्रज येथील नव्या घाटात रस्त्याच्या कडेला टाकून दिला. जवळच त्यांची दुचाकी ठेवली. जेणे करून त्याला वाहनाने उडविल्याने त्याचा मृत्यू झालाचा भास निर्माण केला.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर काही तासांतच आरोपींना अटक करण्यात आल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास केला.