शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची सेवा हमी कागदावरच

By admin | Updated: July 22, 2015 03:02 IST

मोठा गाजावाजा करून महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या १० विभागांमधील विविध प्रकारच्या १५ कामांसाठी सेवा हमी कायदा लागू केला आहे

पुणे : मोठा गाजावाजा करून महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या १० विभागांमधील विविध प्रकारच्या १५ कामांसाठी सेवा हमी कायदा लागू केला आहे. मात्र, या कायद्याची, त्याअंतर्गत होणाऱ्या कामांची तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती असलेले फलक लावण्याचा विसर पालिका प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे असा काही कायदा सुरू आहे का, याची साधी पुसटशी कल्पनाही नागरिकांना नाही. विशेष म्हणजे, क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर असलेल्या कार्यालयांमध्ये हे फलक लागले असले, तरी मुख्य इमारतीत मात्र हे फलक लावण्यास प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. शासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी लोकसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी गुरुवारपासून महापालिकेत करण्यात सुरूवात आली आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेच्या १५ विभागांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी तसेच काही प्रमुख बाबींशी निगडित असलेल्या सेवांसाठी यात कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंड, तर वेळप्रसंगी नोकरीही गमवावी लागणार आहे. कामकाजामध्ये सुप्रशासन आणण्यासाठी तसेच या नागरी सेवा पुरवताना उत्तरदायित्व, संबंधित स्थानिक संस्थेची जबाबदारी तसेच कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासाने अध्यादेश काढला आहे.