शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: February 6, 2016 01:44 IST

नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी योगेश धनसिंग जगताप, उपनगराध्यक्षपदी ज्योती नवनाथ बल्लाळ यांची बिनविरोध निवड झाली

बारामती : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी योगेश धनसिंग जगताप, उपनगराध्यक्षपदी ज्योती नवनाथ बल्लाळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांनी आज पालिकेच्या सभागृहात निवडीची घोषणा केली. निवडीनंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करत अध्यक्ष, उपाध्यक्षांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी काम पाहिले. बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. एकच नगरसेवक विरोधी आहे. सुभाष सोमाणी यांनी नगराध्यक्षपदाचा, रेश्मा यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने दोन्ही पदांच्या निवडी झाल्या. जगताप, बल्लाळ यांच्या नावावर पक्षनेते अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदाची आज निवड झाली. आगामी नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पदे देण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यासह शहराच्या विविध विकासकामांचा वेग कायम राहण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन नियमात कामे करा, असा सल्ला या वेळी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी दिला. गटनेत्या भारती मुथा यांनी सांगितले की, पक्षनेत्यांनी दिलेल्या संधीचे सोने अध्यक्ष, उपाध्यक्षांनी करावे. मावळते नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदावर तरुण नगरसेवकांची वर्णी लागली आहे. निश्चितच त्यांच्याकडून बारामती नगरीचे चांगले काम होईल. पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, नगरसेवक श्याम इंगळे, संजय लालबिगे यांची भाषणे झाली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी सभागृहात शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर बारामती शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दुपारी उशिरापर्यंत सुरू राहिली.