शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषेतील सोसायट्यांना महापालिकेची नोटीस

By admin | Updated: January 13, 2016 03:39 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून नदीपात्रात बांधण्यात आलेला विठ्ठलवाडी ते वारजे हा रस्ता उखडून टाकण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यानंतर आता पाटबंधारे विभागाकडून

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून नदीपात्रात बांधण्यात आलेला विठ्ठलवाडी ते वारजे हा रस्ता उखडून टाकण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. त्यानंतर आता पाटबंधारे विभागाकडून महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार निळी आणि लाल पूररेषा निश्चित केली असून या रेषांमध्ये येणाऱ्या सुमारे १६ सोसायट्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आधीच रस्ता उखडल्याने पुढील वर्षापासून नदीच्या पुराच्या धोक्याची टांगती तलवार असतानाच महापालिकेच्या नोटिशीमुळे नागरिकांमध्ये भीती व असंतोषाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, महापालिकेकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीनुसार, या सोसायट्यांकडून त्यांची मान्यतेची कागदपत्रे मागविण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सिंहगड रस्त्याला पर्यायी असलेल्या या रस्त्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले होते. मात्र, महापालिकेकडून हा रस्ता नदीपात्रात बांधण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून पर्यावरणप्रेमींकडून राष्ट्रीय हरित लावादाकडे त्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, लवादाने हा रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर महापालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने लावादाचा निर्णय कायम ठेवून रस्ता काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, काही महिन्यांपासून हा रस्ता काढण्याचे काम सुरू होते. या निकालातच न्यायालयाकडून पाटबंधारे पूररेषा निश्चित करावी तसेच निळ्या रेषेत येणारे अडथळे काढून टाकण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे महापालिकेकडून निळया रेषेतील ७, तर लाल रेषेत येणाऱ्या ९ सोसायट्यांना मान्यतेची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण या नोटिसांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सोमवारी (दि. ११) बैठक घेऊन महापालिकेच्या या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरातील बांधकामांना यापूर्वी पाटबंधारे विभागाने दिलेल्या एनओसी तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाची मान्यता असताना अशा प्रकारे नोटीस बजावणे योग्य नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. यापूर्वी पूररेषा निश्चित होती, तर बांधकामांना परवानगी दिली कशी? असा सवाल उपस्थित करीत त्याबाबत लढा देण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देण्याची तयारीही नागरिकांनी दर्शविली असल्याचे या बैठकीचे आयोजक सोमनाथ गिरी यांनी सांगितले. महापालिकेकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, पूररेषा निश्चित होईपर्यंत महापालिकेने कारवाई करू नये, अशी मागणी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी केली आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यातही पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित केलेली नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. असे असतानाच अशा प्रकारे रहिवाशांना नोटीस देण्यात आल्याने असंतोषाचे वातावरण असून रेषानिश्चितीनंतरच कारवाई करावी, अशी मागणी नागपुरे यांनी केली आहे.