महापालिकांना निवडणुकीसाठी कर्मचारी मिळेना
By admin | Updated: January 24, 2017 13:48 IST
पुणे महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु सध्या निवडणूक कामासाठी कर्मचारीच नियुक्त न केल्याने निवडणूक कामांचा खोळंबा झाला आहे.
महापालिकांना निवडणुकीसाठी कर्मचारी मिळेना
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना कार्यालयेदेखील देण्यात आली आहेत. परंतु सध्या निवडणूक कामासाठी कर्मचारीच नियुक्त न केल्याने निवडणूक कामांचा खोळंबा झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या वेळी प्रथमच दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या आहेत. या तीनही निवडणूक कामांसाठी तब्बल ५६ हजार कर्मचाºयांची गरज आहे. यामध्ये जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांसाठी तब्बल २४ हजार कर्मचाºयांची गरज आहे. पुणे महापालिकेसाठी २० हजार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी १२ हजार कर्मचाºयांची गरज आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शासकीय शाळांमधील शिक्षक आदी सर्व कर्मचारी हाताशी असल्याने कर्मचाºयांची कमतरता नाही. पण पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी १२ हजार कर्मचाºयांची आवश्यकता असून, सध्या त्याच्याकडे साडेआठ हजार कर्मचारी आहेत.
यामुळे त्यांनी शिरूर, आंबेगाव तालुक्यांतील काही कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पुणे महापालिकेसाठी पाच ते सहा हजार कर्मचारी बाहेरचे घ्यावे लागणार आहेत.
या दोन्ही महापालिकांना कर्मचाºयांची चणचण भासत आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने ग्रामीण भागातील कर्मचाºयांची मागणी केली आहे. परंतु ग्रामीण भागातील बहुतेक सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेसाठीच लागणार असल्याने हे कर्मचारी देण्यास जिल्हाधिकाºयांनी नकार कळविला आहे.
४महापालिका निवडणुकीसाठी तीन प्रभागांसाठी एका उपजिल्हाधिकाºयांची निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येक प्रभागासाठी एक सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
४या नियुक्त्या करून आठ दिवस झाले आहे. पण निवडणुकीसाठी आवश्यक असलेला कर्मचारीच अद्याप नियुक्त न केल्याने निवडणुकीच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी अधिकाºयांची मोठी अडचण झाली आहे.
४कार्यालयात जाऊन काय करायचे, असा प्रश्नदेखील अधिकाºयांना पडला आहे. यामुळे महापालिकांना त्यांच्याच हद्दीतील खासगी आस्थापनावरील कर्मचारी निवडणूक कामासाठी घ्यावे लागणार असल्याची चर्चा आहे.