शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडूनही पुण्यात अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

पुणे : राज्य शासनापाठोपाठ पुणे महापालिकेने ‘अनलॉक’ जाहीर केले असून, दैनंदिन स्वरूपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. ...

पुणे : राज्य शासनापाठोपाठ पुणे महापालिकेने ‘अनलॉक’ जाहीर केले असून, दैनंदिन स्वरूपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. दुपारी चारपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे. पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करू शकणार आहेत. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी दिले.

येत्या सोमवारपासून (दि. ७ जून) या सुधारित नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. बँका, सर्व प्रकारच्या वित्तीय संस्था आठवडाभर काम करू शकणार आहेत. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठीदेखील हे आदेश लागू आहेत. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक ३० जून २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस पूर्णतः बंद राहतील.

सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहणार असली, तरी शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू ठेवता येणार आहे. शहरातील हॉटेलांसह, खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत.

जवळपास चार महिन्यांनी पीएमपीची बस सेवा ५० टक्के आसन क्षमतेने सुरू होणार आहे. नाट्यगृहे तसेच चित्रपटगृहे बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम फक्त ५० टक्के क्षमतेने घेता येणार आहेत. सलून, स्पा आणि ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्याने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल, सिनेमागृह नाट्यगृह. संपूर्णतः बंद राहणार आहेत.

काय राहणार सुरू

१. वकील, सी.ए यांची कार्यालये.

२. रेस्टॉरंट, बार, फुडकोर्ट (आसन क्षमतेच्या ५० टक्के).

सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा घरपोच सेवा रात्री ११.०० पर्यंत सुरू राहील.

३. उद्याने, खुली मैदाने केवळ चालणे व सायकलिंगसाठी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०५.०० ते सकाळी ०९.

४. सर्व खासगी कार्यालये कामाचे दिवशी ५० टक्के कर्मचारी क्षमतेने.

५. सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-१९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

६. शासकीय कार्यालये.

७. सर्व आउटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी ०५.०० ते ०९.०० या वेळेत सुरू राहतील.

८. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम ( ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार).

९. लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.

१०. अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडित कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.

११. विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा, निवडणुका या ५० टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी.

१२. ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरू ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील.

१३. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने/गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.

१४. ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.

१५. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.

-----

व्यायामशाळा, सलून, ब्यूटीपार्लर, स्पा, आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. या ठिकाणी वातानुकूल सुविधा (एसी) वापरता येणार नाही.

-----

माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त. ३ व्यक्ती (चालक, क्लीनर, मदतनीस) यांना इतर प्रवाशांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी राहील. खासगी वाहनातून, बस तसेच लांब अंतराच्या रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधील ठिकाणी थांबायचे असल्यास ई-पास असणे बंधनकारक राहील.

-----

मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार होम डिलिव्हरी सुविधा सुरू राहील.