शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल कंपन्यांविरुद्ध पालिका

By admin | Updated: January 9, 2017 02:59 IST

सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला मोबाईल कंपन्यांकडून त्यांच्या टॉवरसाठी मिळकत कर वसूल करता येईल, असा निर्णय दिला

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला मोबाईल कंपन्यांकडून त्यांच्या टॉवरसाठी मिळकत कर वसूल करता येईल, असा निर्णय दिला; मात्र तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करता येईल किंवा नाही हे संबंधित क्षेत्रातील न्यायालयांनी ठरवावे, असे नमूद केल्यामुळे पालिकेला पुन्हा याबाबतची न्यायालयीन लढाई लागणार आहे. पुणे पालिकेची तब्बल ३९४ कोटी रुपयांची थकबाकी मोबाईल कंपन्यांकडे अडकून पडली असून, यामुळे ती वसूल होणार किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मोबाईल टॉवरना मिळकत कर लागू होतच नाही, असे त्यांचे म्हणणे होते. केंद्रसरकारने सवलत दिल्यामुळे ती सर्वत्र लागू आहे, असा त्यांचा दावा होता. पालिकेने त्यांना मिळकत कर आकारण्यास सुरुवात केल्यानंतर, सर्व मोबाईल कंपन्यांनी प्रथम उच्च न्यायालयात व नंतर थेट सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात दावा दाखल केला.उच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला होता; मात्र त्याला कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यानच्या काळात पालिकेने त्यांना मिळकत कर आकारणी सुरूच ठेवली होती. ती वसूलच होत नसल्यामुळे ज्यांच्या मिळकतीवर हे टॉवर आहेत त्या मिळकतधारकांना पालिकेने नोटिसा बजावल्या. त्यांनी मोबाईल कंपन्या व त्यांच्यात झालेल्या कराराची कागदपत्रे पालिकेला सादर केली. त्यात मिळकत कर वगैरेची जबाबदारी मोबाईल कंपन्यांची असेल असे नमूद केलेले असल्यामुळे पालिकेला मिळकतधारकांविरोधात कसलाही कारवाई करता येईना.(प्रतिनिधी)