शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एसपीव्ही’च्या अध्यक्षपदी महापालिका आयुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 04:25 IST

गेले अनेक महिने चर्चेत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीच्या एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेईकल- स्वतंत्र कंपनी) अध्यक्षपदी अखेर महापालिका आयुक्तांचीच वर्णी लागली.

पुणे : गेले अनेक महिने चर्चेत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीच्या एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेईकल- स्वतंत्र कंपनी) अध्यक्षपदी अखेर महापालिका आयुक्तांचीच वर्णी लागली. राज्य सरकारने कंपनीसाठीच्या मसुद्याला मान्यता दिली असून, आयुक्तांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून अनेकांचे अंदाज धुळीला मिळविले आहेत. मात्र, त्याचबरोबर कंपनीच्या अध्यक्षपदी महापौरच हवेत, या नगरसेवकांच्या मागणीलाही सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.आज (सोमवारी) सायंकाळी पालिका प्रशासनाला कंपनीच्या अध्यक्षपदी आयुक्तच असल्याचा निर्णय समजला. कंपनीच्या १५ संचालक मंडळात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते आणि पालिकेत निवडणून आलेल्या संख्याबळाच्या कोट्यातील ३ प्रतिनिधी, असे एकूण ८ संचालक असतील. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पीएमपीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक असे ३ राज्य शासनाचे प्रतिनिधी, केंद्र सरकारचे ३ प्रतिनिधी व पालिका आयुक्त, असे ७ शासकीय प्रतिनिधी संचालक असतील. एकूण संचालकांपैकी एकतृतीयांश दर वर्षी निवृत्त होणार आहेत. सरकारने मान्य केलेला मसुदा लवकरच जाहीर करण्यात येईल.आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले, की या वर्षीचा निधी त्वरित जमा व्हावा, यासाठीच ही घाई करण्यात येत आहे. या महिनाअखेरपर्यंत (दि. ३१ मार्च) ही नोंदणी गरजेची आहे. लगेचच कंपनीत या वर्षासाठीचे वार्षिक १०० कोटी रुपये जमा होतील. (प्रतिनिधी) वाटाण्याच्या अक्षतानगरसेवकांच्या मागणीसंदर्भात केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याशी बोलण्याचे, तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे जाहीर आश्वासन सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत दिले होते. त्यांचे हे आश्वासनही वाऱ्यावरची वरातच ठरली. नगरसेवकांनी महापौरांना अध्यक्ष करण्याची मागणी केली होती; मात्र सरकारने त्याचा काहीही विचार केलेला दिसत नाही.कंपनीच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्तांची नियुक्ती होईल, असा काहीजणांचा समज होता; मात्र विभागीय आयुक्तांच्या कामाचा व्याप मोठा असतो. महापालिका आयुक्तपदी मी असेन किंवा नसेन; मात्र आयुक्तांचीच निवड होणे योग्य होते.-कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका