शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

महापालिका आयुक्त हाजीर होऽऽऽ!

By admin | Updated: May 4, 2016 04:21 IST

महापालिका प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी संदर्भात अनुसूचित जाती-जमाती आयोगापुढे सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीसाठी

पिंपरी : महापालिका प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी संदर्भात अनुसूचित जाती-जमाती आयोगापुढे सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीसाठी महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी हजर राहण्याचा आदेश आयोगाच्या सदस्य सचिवांनी महापालिकेला बजावला आहे. त्यामुळे मंगळवारीच पदभार स्वीकारलेले नवीन आयुक्त दिनेश वाघमारे यांना या सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चरण यांनी महापालिका प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याची लेखी तक्रार आयोगाकडे केली आहे. त्यानुसार वेळोवेळी या आयोगाने महापालिका प्रशासनाकडे या प्रकरणाचा अहवाल मागविला होता. दरम्यान, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष न्या. सी. एल. थूल यांच्यासमोर १५ फेब्रुवारी २०१६ ला सुनावणी झाली होती. या सुनावणीचे इतिवृत्त २३ फेब्रुवारीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. या सुनावणीकरिता अहवाल सादर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आठ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, त्यानंतर ही मुदत संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरीदेखील महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणाचा अहवाल आयोगाला प्राप्त झालेला नाही. प्रशासनाच्या या निष्काळजीपणाची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. त्यावर आयुक्तांना २८ एप्रिलला आदेश देत महापालिका आयुक्तांनी सविस्तर अहवालासह उपस्थित ६ मे रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याबाबत कळविले आहे. दरम्यान, तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांची नाशिक येथे बदली झाली आहे. (प्रतिनिधी)