शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची सारथी यंत्रणा कुचकामी?

By admin | Updated: July 26, 2016 05:10 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने खड्ड्यांविषयी तक्रार देण्यासाठी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ क्रमांक सुरू केला असून, त्यावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ‘सारथी’सारखी यंत्रणा असतानाही

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने खड्ड्यांविषयी तक्रार देण्यासाठी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ क्रमांक सुरू केला असून, त्यावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ‘सारथी’सारखी यंत्रणा असतानाही शहरातील खड्ड्यांसाठी पुन्हा ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा क्रमांक सुरू करावा लागला असल्याने सारथी यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘सारथी’ कुचकामी ठरत आहे का, असाही मुद्दा उपस्थित होत आहे. शहरातील नागरिकांना खड्ड्याविषयी तक्रार नोंदविण्यासाठी महापालिका प्रशासनाने ७७४५०६१९९९ हा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर फोटो व ठिकाणासह प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करून नागरिकांना कळविण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका पुरवत असलेल्या सेवा, सुविधा, शासकीय कार्यालयांची माहिती घेण्यासह सेवा व सुविधांबाबत तक्रारी नोंदवून घेण्यासाठी महापालिकेने १५ आॅगस्ट २०१३ रोजी ८८८८००६६६६ या क्रमांकावर ‘सिस्टीम आॅफ असिस्टिंग रेसिडेंट्स अँड टूरिझम थ्रो हेल्पलाइन इन्फॉर्मेशन’ (सारथी) ही हेल्पलाइन सुरू केली. या क्रमांकावर शहरातील नागरिक विविध तक्रारी नोंदवितात. तसेच माहितीही घेतात. पूर्वी ही सुविधा सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत दोन शिफ्टमध्ये सुरू होती. १ जानेवारी २०१६पासून ही सुविधा चोवीस तास सुरू करण्यात आली. दरम्यान, या सारथी यंत्रणेद्वारे खड्ड्यांचे प्रश्नही मार्गी लागणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका प्रशासनाने सारथी यंत्रणा असतानाही पुन्हा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ क्रमांक सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यास सारथी कुचकामी ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)धूळफेक ठरूनये-पाटीलस्थापत्य विभागाचा अनागोंदी कारभार, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार यांच्यातील आर्थिक हितसंबंधामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे. दरम्यान, खड्ड्यांविषयीच्या तक्रारीसाठी आयुक्तांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर हजारो तक्रारी आणि फोटो अपलोड झाल्यास त्यावर कार्यवाही किती प्रमाणात होईल, ही शंकास्पद बाब आहे, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.