शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची क्षमता आठ लाख कोरोना लस साठवणूकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:10 IST

पुणे : कोरोनावर येऊ घातलेली लस कशारितीने द्यायची याचे प्रशिक्षण आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देण्याची सुरुवात झाली आहे. त्याचवेळी पुणे ...

पुणे : कोरोनावर येऊ घातलेली लस कशारितीने द्यायची याचे प्रशिक्षण आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देण्याची सुरुवात झाली आहे. त्याचवेळी पुणे महापालिकेने लस साठवणुक क्षमताही मोठ्या प्रमाणात निर्माण केली आहे़ आजमितीला पुणे महापालिकेने आठ लाख लस साठवण्यासाठी डीप फ्रिजरची व्यवस्था केली आहे़

पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले की, महापालिकेने ७० आय़एलआर (५ हजार लिटर) आणि ४० ‘डीप फ्रिजर’ यात ८ लाख लशी साठवण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या सर्व रूग्णालयात ही व्यवस्था करण्यात आली आहे़

कोरोना लसीचे लसीकरण हे मतदान बूथप्रमाणे (३ खोल्यांमध्ये) करण्यात येणार आहे़ यात ५ सेवकांचा एक संघ कार्यरत राहणार आहे़ यात १ लस टोचक आणि १ सुरक्षारक्षक असेल. मतदान प्रक्रियेप्रमाणे लसीकरण मोहिम पार पडणार असून, लसीकरणाच्या पोर्टलवर नाव असलेल्या व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांनाच लस देण्यात येणार आहे़ ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण खुले करण्यात येईल त्यावेळी मोबाईल अ‍ॅपव्दारे संबंधितांना माहिती भरता येणार आहे़ पुणे महापालिकेकडे आजमितीला वैद्यकीय सेवा देणाऱ्या सरकारी व खाजगी अशा ४५ हजार १४३ जणांची नोंदणी करण्यात आल्याचे डॉ. भारती म्हणाले.

चौकट

लसीकरणाचे टप्पे

पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा देणारे सर्व कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात पुणे महापालिका, पोलिस दल, गृहरक्षक अधिकारी व नागरी संरक्षण दल अधिकारी-कर्मचारी यांना तर तिसऱ्या टप्प्यात जोखीमग्रस्त व्यक्ती (५० वर्षावरील व व्याधीग्रस्त) यांना लस देण्यात येणार आहे़ चौथ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे़