शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील स्फोटांचे पुणे कनेक्शन

By admin | Updated: October 1, 2015 01:13 IST

मुंबईच्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी बुधवारी दहशतवाद्यांना फाशीची तसेच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली

पुणे : मुंबईच्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी बुधवारी दहशतवाद्यांना फाशीची तसेच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या बॉम्बस्फोटांचे पुणे कनेक्शनही या घटनेमुळे समोर आले होते. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये पुण्याच्या लष्कर भागातील सोहेल शेख याचा समावेश आहे. तर पुण्यातील रहिवासी असलेले आरोपी मोहम्मद रिझवान डावरे आणि राहिल अतुर रहमान शेख हे गेले दहा वर्षे फरार आहेत. मुंबईतील ७/११ चा बॉम्बस्फोट घडविण्यात या तिघांचा मोठा हात होता.सोहेल मेहबूब शेख (वय ४३, रा. भीमपुरा, लष्कर) हा केंद्र शासनाने बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा हस्तक आहे. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर दहाव्या दिवशीच त्याच्या तपास यंत्रणांनी राहत्या घरामधून मुसक्या आवळल्या होत्या. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो अन्य आरोपींसोबत पाकि स्तानात गेला होता. इराणमधील जियारत या धार्मिक कार्यक्रमासाठी व्हिसा मिळवून तो प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेला होता. दहशतवादी प्रशिक्षण घेतल्यानंतर आरडीएक्सची मोठी तस्करी करण्यात आली होती. त्याचाच वापर करून बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या बॉम्बस्फोटाचा कट पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या आझम चिमा याने आखला होता. सोहेल याच्यावर ६ डिसेंबर २००२ रोजीचा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील बॉम्बस्फोट, २७ जानेवारी २००३ रोजीचा मुंबईमधील विलेपार्ले येथील मार्केटमधील बॉम्बस्फोट, १३ मार्च २००३ मधील मुलुंड रेल्वेमधील बॉम्ब स्फोटप्रकरणीही गुन्हे दाखल आहेत. तर दहा वर्षांपासून फरार असलेल्या रिझवान मोहम्मद डावरे (वय ४०, रा. २०३-बी, प्रेमानंद पार्क, शिवरकर रस्ता, वानवडी) आणि राहिल अतुर रेहमान शेख (रा. बी -१,/२४, कुबेरा गार्डन, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) या दोघांनी बॉम्बस्फोटांसाठी आर्थिक रसद उभी केली होती. हवालाच्या माध्यमातून साडेतीन लाख रुपये पुरवण्यात आले होते. हे दोघेही पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये वेष पालटून राहत असल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे.