शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बहुरंगी, बहुढंगी ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’!

By admin | Updated: February 11, 2017 02:56 IST

‘शहाण्याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती जे! वेडे जगती मनाप्रमाणे, मग जगही त्यांच्या मागे वेडे!’, या ओळींमधून जगावेगळे काहीतरी करूपाहणाऱ्या ‘वेड्या’

पुणे : ‘शहाण्याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती जे! वेडे जगती मनाप्रमाणे, मग जगही त्यांच्या मागे वेडे!’, या ओळींमधून जगावेगळे काहीतरी करूपाहणाऱ्या ‘वेड्या’ माणसांच्या ‘शहाणपणा’ची अनुभूती येते. रसिकांना समृद्ध करणारी हीच अनुभूती अभिवाचन, गाणे, नाट्यानुभव, कविता अशा बहुरंगी, बहुढंगी खजिन्यातून रसिकांना अनुभवता येणार आहे. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’ या पुस्तकावर आधारित भरगच्च खजिना नाट्यानुभव आणि अभिवाचनातून खुला होणार आहे. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज (दि.११) सायंकाळी साडेपाच वाजताही मेजवानीचा आनंद लुटता येईल.डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’ या पुस्तकाचे प्रकाशन २६ जानेवारी रोजी अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात शहाणी माणसं बनवण्याचा चाललेला आटापिटा, जगाप्रमाणे चालण्याची रीत, ही चौकट मोडून काहीतरी वेगळे करू पाहणारी ‘वेडी’ माणसं, सोशल मीडिया असे विविध कंगोरे कौशल्याने टिपले आहेत. त्यामुळे पुस्तकात जणू जिवंत जीवनानुभवच साकारला आहे. या पुस्तकावर आधारित अभिवाचन आणि नाट्यानुभवाचा कार्यक्रम पुणे, डोंबिवली आणि नाशिक येथे सादर झाला. रसिकांकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता, ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’ अनुभवण्याची संधी पुणेकरांना पुन्हा एकदा चालून आली आहे.याबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘चित्र दिवाणखान्यात टांगून पाहुण्यांना त्यातली गंमत नाही तर किंमत सांगणारी ही शहाणी माणसं भवताली पहायला मिळतात. मात्र, या फॅक्टरीत चौकट मोडू पाहणाऱ्या वेड्यांना एका वेड्याकडून दिलेली सप्रेम भेट म्हणजे ‘शहाण्या माणसाची फॅक्टरी’! यामध्ये धमाल गोष्टींपासून ग्रेसच्या कवितांपर्यंत सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकाबाबत वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गोष्ट, प्रसंग जणू आपल्याच आयुष्यात घडल्याची जाणीव प्रत्येकाला होईल, इतका जिवंतपणा यात आहे. हा आविष्कार कविता, गाणी, नाटुकली, अभिवाचन यातून साकारला आहे.’