शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमध्ये होणार बहुभाषिक संमेलन

By admin | Updated: May 26, 2017 06:17 IST

सानेगुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न साकार करणारे बहुभाषिक संमेलन लवकरच भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये रंगणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सानेगुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न साकार करणारे बहुभाषिक संमेलन लवकरच भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये रंगणार आहे. सरहद संस्थेतर्फे आयोजित विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे कॉफी टेबल बुक मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये संमेलन व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि गीतकार गुलजार यांनी पत्रातून व्यक्त केली होती. देशातील सर्व भाषांचे संयुक्त संमेलन व्हावे, अशी भावनाही त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनात व्यक्त केली होती. हाच धागा पकडून सरहदतर्फे यंदाचे बहुभाषिक संमेलन २३ आणि २४ सप्टेंबर रोजी काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. गुलजार यांनी संमेलनाध्यक्षपद भूषवावे, यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. संमेलनासाठी श्रीनगर हे स्थळ निश्चित करण्यात आले असून, बडगाम, टागोर हॉल यांसह तीन ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. या संदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरच्या राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे.सरहद संस्थेतर्फे पहिले बहुभाषिक संमेलन पंजाबमधील घुमान येथे आयोजित करून हा हेतू प्रत्यक्षात उतरवण्यात आला. यंदाचे बहुभाषिक संमेलन काश्मीरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे ‘घुमान बहुभाषा संमेलन’ असे नामकरण करण्यात आल्याचे सरहदचे संजय नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. साहित्यातील भाषेच्या भिंती दूर होऊन ते एकरूप व्हावे, वाचकांना सर्व भाषांमधील साहित्याचा आस्वाद घेता यावा यासाठी सर्व भाषांंधील साहित्यिक, लेखकांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून सातत्याने व्यक्त होत असते. याबाबत माहिती देताना संजय नहार म्हणाले, ‘‘संमेलनासंदर्भात काश्मीरमधील पर्यटन विभाग आणि कल्चरल अ‍ॅकॅडमी यांच्याशी बोलणी सुरू आहेत. पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद शहा यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरला जाऊन राज्यपाल तसेच सरकारशी अधिकृत बोलणी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. काश्मीरमधील स्थानिक माणसाचा खराखुरा उदारमतवादी चेहरा देशासमोर यावा, हाच या संमेलनामागचा उद्देश आहे. यंदाच्या संमेलनात राष्ट्रीय ऐक्य, भाषांमधील देवाणघेवाण आदी विषयांचा परिसंवादात समावेश करण्यात येणार असून, समृद्ध विचारमंथन होईल, अशी अपेक्षा आहे.’’