शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुळा-मुठा नदी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : पावसाळा सुरू झाला असला तरी अत्यल्प पावसामुळे खडकवासला धरण साखळीतून विसर्ग झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : पावसाळा सुरू झाला असला तरी अत्यल्प पावसामुळे खडकवासला धरण साखळीतून विसर्ग झाला नसल्याने तसेच पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही महानगरपालिकांनी आपले रसायन व मलजलयुक्त पाणी प्रक्रिया न करता जसेच्या तसे नदीत सोडल्याने मुळा-मुठा नदी प्रदूषित झाली आहे.

आयुर्वेदात ज्या गावची नदी स्वच्छ त्या गावाचे आरोग्य चांगले असे अगदी नि:संदिग्धपणे म्हटले आहे. मुळा-मुठा नदी हीसुद्धा त्याला अपवाद नाही. पानशेत पुरानंतर नदीचे पाणी आसपासच्या भागात कुठवर जाते. याची कल्पना आल्यानंतर किमान तो भाग मोकळा करणे हे पालिकेला शक्य होते. तेथील सर्व बेकायदा अतिक्रमणे हटवणेही गरजेचे असताना तसे घडले नाही. उलट तेथील वस्त्या आहे तिथेच राहिल्या आणि नदीत बांधकामांचा राडारोडा टाकणाऱ्यांचे प्रमाणही वाढत गेले. त्यावर कोणताच प्रतिबंध राहिला नाही. शहरातून वाहणारी नदी ही केवळ या शहराची जीवनवाहिनी नाही तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता समजली जाते. कारण मुळा-मुठा नदीचे गटारगंगेत झालेले रूपांतर हे पुणे शहर व नदीनजीकच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्या बाबतच्या वाढत्या तक्रारीमागे एक महत्त्वाचे कारण आहे, हे सिद्ध झाले आहे. या नदीकडे गेल्या सुमारे पाच ते सहा दशकांत दुर्लक्ष झालेने असल्यामुळे तिची व तिच्या आसपासची परिस्थिती बिकट झाली आहे. पानशेत पुरापासून तेथे वाढत गेलेली अतिक्रमणे हे त्यातले एक महत्त्वाचे कारण आहेच. पण त्याबरोबरच या नदीत शहरातील ठिकठिकाणांहून येणारे मैलायुक्त पाणी शिरल्यामुळे नदीतील अनेक जलचर प्रजाती नष्ट झाल्या आहेत. यांमुळे संपूर्ण जलसृष्टीच धोक्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने दररोज लाखो लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जात असल्याचे सांगितले जाते. परंतु लोणी काळभोर परिसरातील विश्वराज बंधा-याच्या खालील भागात पाण्यावर जमा होत असलेला एक ते दीड फूट उंचीचा दुर्गंधीयुक्त फेसाचा थर पाहिला तर हा दावा फोल ठरतो. पुणे महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. परंतु ती नावालाच असल्याने पाणी जसेच्या तसे नदीत येते. ग्रामीण भागातील शेतकरी याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात. पुढे हेच पाणी उजणी धरणांतून थेट सोलापूर जिल्ह्यात जाते. नदीतीरावर असलेल्या गावातील नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात यांमुळे त्यांना काहीच दोष नसताना गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा आदी आजारांसह पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

फोटो - लोणी काळभोर येथे मुळा-मुठा नदीची आजची अवस्था.