शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगर रोड बीआरटीला २५ एप्रिलचा मुहूर्त

By admin | Updated: April 18, 2016 03:04 IST

नगर रस्त्यावरील बीआरटी बसच्या टर्मिनलसाठी वाघोली येथील अडीच एकर जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आल्याने अखेर नगर रोड बीआरटीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी बसच्या टर्मिनलसाठी वाघोली येथील अडीच एकर जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आल्याने अखेर नगर रोड बीआरटीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २५ एप्रिल रोजी नगर रस्त्यावरील बीआरटीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली आहे. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग तयार होऊन दोन वर्षे झाले तरी तांत्रिक अडचणींमुळे तो अद्याप खुला करण्यात आलेला नव्हता. बीआरटी बसचे टर्मिनल उभारण्यासाठी जागेचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. राज्य शासनाने महापालिकेला वाघोली येथील अडीच एकर जागा दिली होती; मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे त्या जागेचा ताबा मिळण्यात अडचणी येत होत्या. अखेर रविवारी पोलीस बंदोबस्तामध्ये या जागेवरील अतिक्रमण काढून त्याचा ताबा घेण्यात आला.प्रशांत जगताप यांनी सांगितले , ‘‘जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेच्या मदतीतून वाघोली येथील अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन या दोघांचे मी आभार मानतो. आता उर्वरित कामे पूर्ण करून येत्या २५ एप्रिलपासून बीआरटी कार्यान्वित करू.’’बीआरटी मार्गावरील बसथांबे व बसमध्ये आयटीएमएस यंत्रणा बसविल्याशिवाय हा मार्ग सुरू करू नये अशी अट केंद्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी पालिकेला घातली होती. त्यानुसार आयटीएमएस यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बीआरटी मार्गातून केवळ पीएमपीच्या बसनाच प्रवेश असणार आहे. त्यामुळे इतर वाहनांनी या मार्गात घुसखोरी करू नये याकरिता योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. नगर रस्त्यावरून शहराबाहेरील जड वाहने मोठ्या संख्येने पुण्यात प्रवेश करतात, त्यांना बीआरटी मार्गातून प्रवेश नसल्याचे मोठे फलक त्याठिकाणी लावण्यात येणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पादचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना पार पाडल्या जात आहेत.बीआरटी मार्गावरील सिग्नल यंत्रणा, पादचाऱ्यांची सुरक्षा, इतर दुरुस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या मार्गावर पुरेशा संख्येने सफाई कामगार व वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. बसचालक व वाहकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.