शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:15 IST

बजरंगआळीमधील कुंभार टेकडी तालीम सार्वजनिक ट्रस्टतर्फे तब्बल ११४ वर्षांपासून गणेशोत्सव आणि मोहरम उत्सव एकत्र साजरे केले जातात.

भोर : शहरातील बजरंगआळीमधील कुंभार टेकडी तालीम सार्वजनिक ट्रस्टतर्फे तब्बल ११४ वर्षांपासून गणेशोत्सव आणि मोहरम उत्सव एकत्र साजरे केले जातात. एकाच मंडपात गणपतीची मूर्ती आणि ताबूत बसविण्यात येतात. हिंदु-मुस्लिम ऐक्याचा हा वेगळा नमुना पाहायला मिळत आहे.बजरंगआळीत कुंभार टेकडी तालीम ट्रस्टने गणेशोत्सव व मोहरम उत्सव सुरू केला. पूर्वीच्या काळी गाव मंडळ म्हणून शहरात प्रसिद्ध होते. त्या वेळी शेटेवाडी, भोईआळी, भेलकेवाडी, वेताळपेठ संपूर्ण शहरातील ज्येष्ठ मंडळ याच ठिकाणी एकत्र येत असत. त्यामुळे एकेकाळी शहरातील नावाजलेले मंडळ होते.मंडळात पूर्वी पांडुरंग कुंभार, धोंडिबा शेटे, बबन कांबळे, दिनकर पाटणे, बाळासो आलाटे, रमणशेठ शहा या दिग्गजांनी मंडळात अनेक वर्षे काम केले. सध्या मंडळाचे अध्यक्ष विलास कांबळे, उपाध्यक्ष जितेंद्र महाडिक, तर सचिव म्हणून कासमभाई आतार काम पाहत आहेत. मंडळात पूर्वी संपूर्ण मातीची गणेशमूर्ती होती. अनेक वर्षे ही मूर्ती आहे, मात्र काळाच्या ओघात ती जीर्ण झाली. ११४ वर्षांपासून गणेशोत्सव व मोहरम साजरा करण्याची परंपरा कायम आहे.भोर गणपतीकाळात भोर शहरात सुमारे ४० वर्षांपूर्वी देखावा म्हणून विद्युत रोषणाई (गाण्याच्या तालावर नाचणारी लाईट) कासमभाई आतार यांनी सुरूकेली. ३५ वर्षांपासून गणेश जयंती साजरी करून भोर ते नारायणपूर पायी दिंडीसोहळा साजरा केला जातो.>ताबूत आणी गणपती एकाच मंडपात एकाच व्यासपीठावर ठेवून दोन्ही धर्माचे लोक एकत्रीतपणे भक्तिभावाने गणेशोत्सव आणी मोहरम साजरा करुन ताबूत आणि गणपती विसर्जन करण्याची १०० वर्षांची परंपरा आजही कायम आहे. यामुळे भोर शहरात हिंदू, मुस्लिम एकत्र नांदत आहेत. कुंभार टेकडी तालीम सार्वजनिक ट्रस्टने एकाच मंडपात ताबूत आणी गणपती बसवला आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८ganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव