शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकरांना मैलायुक्त पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: May 3, 2017 01:47 IST

अलंकापुरीतील गहन बनत चाललेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीची तहान भागविण्यासाठी आंद्र्रा धरणातून २०० क्युसेक्सने

शेलपिंपळगाव : अलंकापुरीतील गहन बनत चाललेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीची तहान भागविण्यासाठी आंद्र्रा धरणातून २०० क्युसेक्सने इंद्रायणीत पाणी सोडण्यात आले आहे. मात्र,आळंदीकर कारभारी व शिवसेना आपल्याच विनंतीने आळंदीकरांच्या पिण्यासाठी पाणी सोडल्याचा दावा करत आहे. प्रत्यक्षात आळंदीच्या धरणात अद्याप आंद्र्राचे पाणी आले नाही. त्यामुळे आळंदीकरांच्या बंद नळाला मैलायुक्तच पाणी येत आहे. पिंपरी-चिंचवडच्या चिखली, तळवडे हद्दीतून पिंपरी-चिंचवडचे मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत सोडल्याने आळंदीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील बनत आहे. सध्या आळंदीतील इंद्रायणी कोरडी पडल्याने पाणीपुरवठ्याच्या बंधाऱ्यावर संपूर्णपणे मैलायुक्त गाळ साचला आहे. त्यातूनच अपुऱ्या यंत्रणेवर पाणी शुद्ध करावे लागत असल्याने मागील ८ दिवसांपासून आळंदीत नळाला मैलायुक्त पिण्याचे पाणी येत आहे. नळाचे पाणी पिण्यायोग्य तर सोडा आंघोळीच्याही लायकीचे नसल्याचे चित्र आहे. प्रभारी मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आदींच्या प्रयत्नाने पाण्याचा थोडाफार रंग बदलला होता. परंतु चव मात्र तीच असल्याने पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी विकतचे पाणी वापरण्याची पाळी आळंदीकरांवर आली आहे. नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या पुणे शाखेला शनिवारी (दि. २९) पत्रव्यवहार करून आळंदीला वडिवळे अथवा जाधववाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत ई-मेल केल्याची माहिती पत्रकारांना पत्राद्वारे दिली होती. प्रत्यक्षात २५ तारखेलाच आंद्र्रा धरणातून पाणी सोडले होते. मात्र, शिवसेना पाणी सोडण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला असल्याचे सोशल मीडियावर सांगत आहे. आळंदीत नागरिकांनी नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. पिण्याचे पाणी आळंदीकरांना मिळवून देऊ, यासाठी सेना-भाजपा यांनी दोन्हीकडून दावा केला जात होता. (वार्ताहर)मावळ पाटबंधारे विभागातील शाखाधिकारी ए. आर. हांडे यांना विचारले असता, २५ एप्रिलला आंद्रा धरणातून आळंदी परिसरातील शेतीसाठी पाणी सोडले आहे. याबाबत मोशी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्याची सूचना आली होती. सुमारे दोनशे क्युसेक्स पाणी सोडले असून मंगळवारी रात्रीपर्यंत आळंदीत पाणी पोहोचेल. चिंबळी, मोई, धानोरे, मरकळ, चऱ्होली या भागातील शेतकऱ्यांबरोबर आळंदीच्या पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल, असे हांडे यांनी सांगितले.