शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

ब्लॅक फंगसवरील उपचाराचा खर्च 100 पटींनी कमी होईल; पुण्याच्या डॉक्टरांनी शोधला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 13:27 IST

cost of treatment on black fungus will be reduced by 100 times: ब्लॅक फंगससाठी अँटी फंगल इंजेक्शनचा तुटवडा आहे. कोरोना नंतर ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांचा एका दिवसाचा खर्च हा जवळपास 35000 रुपये आहे. जो 100 पटींनी कमी होऊन 350 रुपये एवढाच होऊ शकतो.

Black fungus treatment cost:  कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. अनेकांना कोरोना उपचारानंतर ब्लॅक फंगसचा (Black fungus) सामना करावा लागला आहे. य़ा म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे. या रुग्णांनी लक्षणे कशी ओळखावीत हे एम्सने सांगितले आहे. मात्र, याचे उपचारही कोरोनासारखेच महागडे आणि औषध टंचाईचे आहेत. यामुळे पुण्याच्या डॉक्टरांनी ब्लॅक फंगसवरील उपचार पद्धतीचा कमी खर्चाचा पर्याय सुचविला आहे. (Black fungus treatment cost can 100 times cheaper with blood creatinine test.)

ब्लॅक फंगससाठी अँटी फंगल इंजेक्शनचा तुटवडा आहे. कोरोना नंतर ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांचा एका दिवसाचा खर्च हा जवळपास 35000 रुपये आहे. जो 100 पटींनी कमी होऊन 350 रुपये एवढाच होऊ शकतो. डॉक्टरांनी ब्लॅक फंगसवर उपचाराचा एक पर्याय सुचविला आहे. यामध्ये सावधानतेने रुग्णाच्या रक्तातील क्रिएटिनिन लेव्हलवर लक्ष ठेवावे लागणार आहे. यामुळे उपचाराचा खर्च कमी होणार आहे. (shortage of black fungus injection.)

ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी वापरले जाणारे इंजेक्शन हे एम्फोटेरेसिन आहे. रेमडेसीवीर सारखीच या इंजेक्शनची देखील टंचाई आहे. इंजेक्शनची किंमत जास्त आहेच, परंतू ते सहज मिळत नाहीय. यामुळे दुसरे उपचार पद्धती वापरून यावरील खर्च खूपच कमी केला जाऊ शकतो. यासाठी दर दुसऱ्या दिवशी रुग्णाची रक्त चाचणी करावी लागणार आहे. 

पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे ENT हेड समीर जोशी यांनी सांगितले की, कोरोना नंतर ब्लॅक फंगसच्या 201 रुग्णांवर उपचार केले आहेत. यापैकी 85 टक्के रुग्ण हे conventional amphotericin आणि सर्जरी केल्यानंतर बरे झाले आहेत. कोरोनाच्या आधी याच पद्धतीने ब्लॅक फंगसचे 65 पैकी 63 रुग्ण बरे झाले आहेत. सर्जरीमध्ये मृत पेशी काढून टाकल्या जातात. दुसरे ENT सर्जन संदीप कर्माकर यांनी सांगितले की, conventional आणि Liposomal amphotericin उपलब्ध होत नाहीय. conventional चा खर्चही कमी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर