शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विजेते झिजवताहेत ‘एमटीडीसी’चे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 01:22 IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत कलाकारांच्या कलाकृतीवर पारितोषिकांची मोहोर उमटली खरी

नम्रता फडणीस,  पुणेपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत कलाकारांच्या कलाकृतीवर पारितोषिकांची मोहोर उमटली खरी; परंतु तीन महिने उलटून गेले, तरी पारितोषिकांची रक्कमच विजेत्यांच्या हाती पडली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हक्काच्या पैशांसाठी विजेत्यांवर एमटीडीसीचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे. एखाद्या स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याचा आनंद काही निराळाच असतो. त्यातही जर पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक आणि तेही घसघशीत रकमेचे असेल, तर मग विचारायलाच नको. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी पारितोषिक हुरूप देणारे असते. अशीच काहीशी आनंदानुभूती स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आली. पारितोषिक जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासाठी जणू आकाशच ठेंगणे झाले होते. दर वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) एमटीडीसीतर्फे लघुपट स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या वर्षी ‘औरंगाबाद अ‍ॅज अ टुरिस्ट डेस्टिनेशन’, ‘वाईल्ड लाईफ आॅफ विदर्भ (ताडोबा) आणि ‘कोकण- बीचेस अ‍ॅँड स्कूबा डायव्हिंग’ अशा तीन विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या तिन्ही विभागांमधून पिफच्या समारोपामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. यामध्ये पारितोषिकाची रक्कम ही अनुक्रमे १ लाख २५ हजार रुपये व ७५ हजार रुपये, अशी होती. पारितोषिकाच्या रकमेतील विलंबासंदर्भात एमटीडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून एमटीडीसीला निधीच उपलब्ध झालेला नाही. नुकतीच आॅर्डर निघाली आहे. मात्र, पैसे जमा झाल्यानंतरच धनादेश काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.