शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगतचे नियोजन एमएसआरडीसीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 01:23 IST

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गालगतच्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला विशेष नियोजन प्राधिकरण नेमण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला

पुणे : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गालगतच्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला विशेष नियोजन प्राधिकरण नेमण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून त्यामुळे अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर गेल्या वर्षी अस्तित्वात आलेल्या पीएमआरडीएच्या (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) कार्यक्षेत्रावर अतिक्रमण होणार आहे़ मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या दोन्ही रस्त्यांंमधील क्षेत्र व या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अंदाजे २-२ किमी अंतरामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ७५ गावे, खालापूर तालुक्यातील ७५ गावे आणि पनवेल तालुक्यातील ५२ गावे आहेत़ या क्षेत्रासाठी एमएसआरडीसीला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव नगर रचना विभागाकडे गेल्या वर्षी देण्यात आला होता़ त्याअनुशंगाने नगर विकास विभागाने याच्याशी संबंधीत सर्व विभागांना या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपला अभिप्राय देण्यास व या प्रस्तावास मान्यता देण्याची नगर विकास विभागास विनंती करण्यात यावी, असे पत्र पाठविले होते़ त्यानुसार सर्व विभागाने असे पत्र नगर विकास विभागाकडे पाठविले आहे़ पीएमआरडीएचे काम नुकतेच सुरु झाले आहे़ या प्रस्तावामुळे पीएमआरडीए तसेच खालापूर तालुक्यातील नयना फेज १ व २ मधील काही गावांचे क्षेत्र प्राधिकरणा्च्या हद्दीमधून वगळून एमएसआरडीसीकडे हस्तांतरीत करावी लागणार आहे़ याबाबत सजग नागरीक मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले, की रस्ते बांधणी असे मुळ उद्दिष्ट ठेवून स्थापन झालेल्या एमएसआरडीसी ला अजून स्वत:ची कामे नीट करता येत नाही़ टोलमधील झोल सप्रमाण सिद्ध झाला आहे़ ते विकास आराखडा बांधकाम आराखड्यापर्यंत व पाणीपुरवठ्यापासून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबी करु शकेल, यावर विश्वास बसणार नाही़