शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर मिळणार महावितरणचे अ‍ॅप

By admin | Updated: May 24, 2017 03:55 IST

दर महिन्याला येणारे महावितरणचे वीजबिल नव्या रंगात आणि सुटसुटीत माहितीसह ग्राहकांना मिळू लागले आहे. या वीजबिलावरील ‘क्यूआर’ कोडच्या साह्याने

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : दर महिन्याला येणारे महावितरणचे वीजबिल नव्या रंगात आणि सुटसुटीत माहितीसह ग्राहकांना मिळू लागले आहे. या वीजबिलावरील ‘क्यूआर’ कोडच्या साह्याने अवघ्या एका क्लिकवरून महावितरणचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. अ‍ॅन्ड्रॉईड, विन्डोज आणि आयओएस आॅपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईल ग्राहकांना क्यूआर कोडच्याइमाध्यमातून हे अ‍ॅप तत्काळ डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. महावितरणच्या वीजबिलाची रंगसंगती गेल्या अनेक वर्षांपासून एकसारखीच होती. त्याशिवाय अनेक प्रकारची माहिती आणि जाहिरातींचा भरणा यामुळे नागरिकांना आवश्यक माहिती शोधावी लागत असे. एकाच रंगसंगतीत येणारे वीजदेयक बदलण्याच्या दृष्टीने महावितरणने प्रयत्न केला आहे. नव्या स्वरूपातील वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यात येत आहे. जुन्या बिलाच्या तुलनेत ते सुटसुटीत; तसेच रंगसंगतीमुळे अधिकच आकर्षक झाले आहे. विशेष म्हणजे सद्य:स्थितीत बारकोडपेक्षाही अधिक वापर असलेला ‘क्यूआर’ (क्विक रिस्पॉन्स) कोड या वीजबिलावर आहे. याद्वारे महावितरणचे मोबाईल अ‍ॅप थेट डाऊनलोड करता येत आहे. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड करून घेतलेल्या क्यूआर कोड रीडरच्या माध्यमातून वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाईल अ‍ॅपची लिंक मिळत आहे.