शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

एम.एस्सीच्या प्रश्नपत्रिका एक तास उशीरा

By admin | Updated: May 7, 2014 00:48 IST

पुणे विद्यापीठाच्या एम.एस्सी. विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना तब्बल एक तासाने उशिरा मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा.

पुणे : पुणे विद्यापीठाच्या एम.एस्सी. विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना तब्बल एक तासाने उशिरा मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे काम अजूनही गोंधळाच्या वातावरणातच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात सकाळ आणि दुपारच्या सत्रात एम.एस्सी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र इलेक्ट्रानिक्स, गणित आदी विद्याशाखांनिहाय विषयांच्या परीक्षा होत्या. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात अर्धा तास उशिराने देण्यात आल्या. तसेच दुपारच्या सत्रात पाऊण तास उशिरांनी प्रश्नपत्रिका मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व काही येत असताना, व्यवस्थित उत्तरे लिहू न शकल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. वाडिया, पूना कॉलेज आणि फर्ग्युसनसह अन्य महाविद्यालयात हाच प्रकार घडला. एम.एस्सीच्या अंतिम वर्षाच्या महत्त्वाच्या परीक्षा होत्या. या परीक्षेवरच पुढील शैक्षणिक भवितव्य अवंलबून असते. मात्र, उशिराच प्रश्नपत्रिका मिळाल्याने परीक्षेची उत्तरे लिहिण्याची मानसिक स्थिती राहिली नाही. त्यामुळेे पेपर व्यवस्थित सोडविता आले नसल्याचे वाडिया कॉलेजमधील एका विद्याथ्याने सांगितले. या सर्व प्रकाराला विद्यापीठाचा परीक्षा विभागाच जबाबदार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधले असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही. विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. के. सी. मोहिते यांनी मात्र माझ्यापयंर्त अशी काही तक्रार आली नसल्याचे सांगितले. ---------व्यवस्थापन परिषदेत परीक्षा नियंत्रकांविषयी चर्चापुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची बैठक मंगळवारी झाली. मात्र, कोणत्याही धोरणात्मक विषयांवर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. निलंबित परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांच्याविषयी चर्चा झाली. कुलगुरूंनी या कारवाईबाबतचा तपशिल सदस्यांपुढे मांडला. याबाबत संपदा जोशी यांनी कोर्टात विद्यापीठाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाला आहे, त्यामुळे चर्चा आवरती घेण्यात आली.