शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

एमपीए ‘अ’ उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: April 25, 2017 04:23 IST

पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित इंदिरा जोशी स्मृती १८ वर्षांखालील जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील

पुणे : पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित इंदिरा जोशी स्मृती १८ वर्षांखालील जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील संघाचे आव्हान एक्स्ट्रा टाइममध्ये ५०-४८ने संपवून थरारक विजयासाह एमपीए ‘अ’ने सोमवारी मुलांच्या गटातून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.कोथरूड येथील मिलेनियम नॅशनल स्कूलच्या बास्केटबॉल कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या गटात आज झालेल्या झालेली उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांपैकी एमपीए ‘अ’ आणि डी. वाय. पाटील संघांतील लढत लक्षवेधी ठरली. हाफ टाइममध्ये २०-११ने आघाडीवर असलेल्या एमपीए ‘अ’ला नंतर मात्र डी. वाय. पाटील संघाच्या खेळाडूंनी जबरदस्त झुंज दिली. यामुळे सामना संपला तेव्हा स्कोअर ३८-३८ असा बरोबरीत होता. निकालाची कोंडी फोडण्यासाठी एक्स्ट्रा टाइमचा वापर करण्यात आला. यात एमपीए ‘अ’च्या खेळाडंूनी बाजी मारत संघाला ५०-४८ असा अवघ्या २ गुणांनी रोमांचक विजय मिळवून दिला. साहिल पटेल (१७) आणि अथर्व ताम्हाणे (१५) एमपीए ‘अ’च्या विजयाचे शिल्पकार ठरले. डी. वाय. पाटील संघातर्फे राहुल गुजर (२१), शेखर उपाध्ये (१२) यांनी दिलेली झुंज थोडक्यात अपयशी ठरली. अक्षय भोसले जिमखाना (एबीजी) संघाने पीवायसीचे आव्हान ५५-४७ने संपवून अंतिम आठ संघांमध्ये प्रवेश केला. विजयी संघातर्फे ओंकार गद्रे आणि जोगिंदर संधू यांनी प्रत्येकी १५ गुण नोंदविले. पीवायसीकडून आरिक गरवारे (२०) आणि अर्जुन कोचर (१०) यांनी चमकदार खेळ केला. मात्र, त्यांना इतर खेळाडूंकडून साथ लाभली नाही. पंकज चौधरी (१७) आणि दर्शन दाभाडेच्या (११) खेळामुळे चुरशीच्या लढतीत विद्यांचल ‘अ’ने एमएएसए संघावर ५७-५५ अशी निसटत्या फरकाने सरशी साधली. सीएनएसएने गुरुनानक पब्लिक स्कूलवर ५४-३१असे सहजपणे सरशी साधली. स्काय लाऊंज ‘अ’ने एसएपीचा २८-७ने धुव्वा उडविला.हाय स्कोअरिंग लढतीत डेक्कन जिमखाना ‘अ’ संघाने आयडिलचा ६९-४९ असा पराभव केला. ३७ गुण नोंदविणारा नागेश सुतार विजयाचा शिल्पकार ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)