लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही वाढ होत आहे, असे त्यांच्यावर उपचार करणारे जहांगीर रुग्णालयातील डॉ. सत्यजितसिंग गिल यांंनी ही माहिती दिली. कृषि राज्यमंत्री विश्वनाथ कदम या वेळी उपस्थित होते.
उपचारांसाठी म्हणून सातव यांना कुठेही हलवणार नसून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. कोरोनाबाधित झाल्याने सातव यांंना २५ एप्रिलला जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कदम यांनी शुक्रवारी सलग दिवशी सातव यांच्या तब्बेतीची जहांगीरमध्ये जाऊन विचारपूस केली.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जहांगीर रुग्णालयात भेट देऊन सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.