शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबपुष्प देऊन आंदोलनाला सुरुवात

By admin | Updated: June 2, 2017 01:59 IST

भाजपा सरकारच्या ३ वर्षांच्या काळात शेतकरी मेटकुटीला आला असतानाच गेल्या १ महिन्यात सधन समजणाऱ्या जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : भाजपा सरकारच्या ३ वर्षांच्या काळात शेतकरी मेटकुटीला आला असतानाच गेल्या १ महिन्यात सधन समजणाऱ्या जिल्ह्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात आजपर्यंत सर्वाधिक आत्महत्या फडणवीस सरकारच्या काळात होऊनही सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर देतच नाही शिवाय कर्जमाफीही करत नसल्याने शेतकऱ्यांनी उभारलेल्या संपास शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गर्दे यांनी केले.शेतकरी संघटनेच्या वतीने कोरेगाव भीमा आठवडे बाजारमध्ये विक्रेते व शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शांततेच्या मार्गाने ‘शेतकरी संप’ आंदोलनास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांना गुलाबपुष्प देत दुकाने बंद करण्यास सांगण्यात येत होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष सुहास काटे, लक्ष्मण रांजणे, शिरुर तालुकाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, बापुसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ, चंद्रकांत धुमाळ, विशाल भुजबळ, सुभाष धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, किसन पलांडे, गणेश दौंडकर, सत्यवान धुमाळ उपस्थित होते.शरद गर्दे म्हणाले, ‘१ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून तालुक्यातील २० दूध डेअरी शांततेच्या मार्गाने बंद करण्यात आल्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ कधी येणार?शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची अजून वेळ आली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करण्यासाठी वेळ येणार तरी कधी, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद गर्दे यांनी केली.