शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंगनिदान कायदा बदलासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 01:36 IST

र्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यातील जाचक तरतुदी काढून त्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी सोनोग्राफीतज्ज्ञांनी सरकारला सहा

पुणे : गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यातील जाचक तरतुदी काढून त्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी सोनोग्राफीतज्ज्ञांनी सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. सरकारने प्रतिसाद न दिल्यास बेमुदत संपावर जाण्याचा आणि न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय सोनोग्राफीतज्ज्ञांच्या संघटनेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. इंडियन रेडिओलॉजिकल व इमेजिंग असोसिएशनच्या (आयआरआयए) पुणे शाखेने पुकारलेल्या सोनोग्राफी बंद आंदोलनाला राज्यातील सर्व डॉक्टरांच्या संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, पुणे शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भुतकर यांनीही सोनोग्राफी तज्ज्ञांच्या या आंदोलनाला लेखी पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यातील जाचक तरतुदींच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील सर्व रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट यांनी तीन दिवसांचे काम बंद आंदोलन छेडले आहे. डॉक्टरांची आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना असोसिएशनचे कार्यकारी व सल्लागार सदस्य डॉ. ए. बी. केळकर म्हणाले, गर्भलिंगनिदानाद्वारे स्त्री-भ्रूणहत्या करण्याच्या अमानवी कृतीचा आम्ही विरोध करतो. अशा सामाजिक गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. परंतु, स्त्री-भ्रूणहत्येसारखा गंभीर गुन्हा करणाऱ्यांना आणि रुग्णांच्या माहिती संकलनाच्या प्रक्रियेत कागदोपत्री किरकोळ त्रुटींसाठी एकच शिक्षा असू नये, आमचे ठाम मत आहे. प्रामाणिक सोनोग्राफीतज्ज्ञ डॉक्टरांना केवळ क्षुल्लक कागदोपत्री त्रुटींसाठी नाहक त्रास होऊ नये, यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. (प्रतिनिधी) असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. वीरेन कुलकर्णी म्हणाले, की आमच्या मागण्यांच्यासंदर्भात बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. गंभीर वैद्यकीय परिस्थितीतील रुग्णांसाठी सोनोग्राफीची अत्यावश्यक सेवा काही रुग्णालयांमध्ये सुरू ठेवण्यात आली आहे. उद्या हे काम बंद आंदोलन थांबविण्यात येणार असून प्रशासनाने याबाबत वेळेतच योग्य ती कार्यवाही करावी. अशाप्रकारे डॉक्टरांनी केलेल्या एकदिवसीय बंदचा रुग्णांना मोठा फटका बसला. या संपात आपण सहभागी नाही, असे दीनानाथ मंगेशकरसारख्या शहरातील काही मोठ्या हॉस्पिटल्सकडून सांगण्यात येत होते, मात्र तेथील कर्मचारी व रुग्णांनी सोनोग्राफीची सुविधा बंद असल्याचे सांगितले.