शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

बारामतीत महायुतीच्या हालचाली

By admin | Updated: January 26, 2017 00:04 IST

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बारामती तालुक्यात सरळ लढतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विरोधात

बारामती : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बारामती तालुक्यात सरळ लढतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विरोधात सर्वपक्षीय महायुतीच्या माध्यमातून आव्हान देण्याची तयारी सुरू असतानाच ‘तिसऱ्या आघाडी’ने डोके वर काढले आहे. या तिसऱ्या आघाडीला रोखण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबरोबरच महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रभावी कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीतील मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे. भाजपा, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका पार पडल्या. रासपाने १ जिल्हा परिषद गट, ५ पंचायत समिती गण मागितले आहेत. रिपाइं ज्या जागा मिळतील त्या पदरात पाडून घेण्यास तयार आहे. मागील निवडणुकीत विरोधकांनी जिल्हा परिषदेचा एक गट जिंकला होता. ४ जागा पंचायत समितीच्या जिंकल्या होत्या. त्यामुळे सध्या भाजपा-सेना सत्तेत असल्यामुळे बारामती तालुक्यात पक्षाचे बळ वाढवण्यासाठी भाजपाचे विशेष प्रयत्न आहेत. तर, विरोधकांपुढे तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार करतील, असे चित्र आहे. नगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे जिल्हा परिषदेची १ आणि पंचायत समितीच्या २ जागा कमी झाल्या आहेत. पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. माळेगाव, सांगवी हे दोन गण या प्रवर्गासाठी राखीव आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुकांची संख्या अधिक असली, तरी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली जाईल, हे निश्चित. सुपे मेडद गटात चुरशीची लढत होईल. त्यामुळे त्या गटात चांगला उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीची चाचपणी सुरू आहे. याशिवाय, करंजेपूल-निंबूत या गटात विरोधकांचा प्रभाव कमी करण्यासाठी खास प्रयत्न केले जातील. या गटातून १२ जण इच्छुक आहेत. परंतु, राजकीय तडजोड म्हणून काकडे कुटुंबातील इच्छुकाला जागा देण्याची शक्यता आहे. ते जवळपास निश्चित झाल्याची चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, वडगाव निंबाळकर-मोरगाव गटातदेखील अन्य गटातील मार्ग सुकर करण्यासाठी वेगळी राजकीय चाल खेळली जाईल, असे चित्र आहे. या गटात तब्बल २७ जण इच्छुक आहेत. या निवडणुकांमध्ये जातीय समीकरण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. (वार्ताहर)