शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपांची वीज खंडित केल्यास आंदोलन

By admin | Updated: April 8, 2016 00:55 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा आठ तासांपेक्षा कमी केला अथवा खंडित केल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा आठ तासांपेक्षा कमी केला अथवा खंडित केल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे उपसभापती नारायण वीर, कर्मयोगीचे संचालक वामनराव सरडे, बिभीषण बोंगाणे, अंकुश पाडुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उजनी धरणातील असणारे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र जलसंपत्ती विभाग प्राधिकरणाच्या ६ जानेवारीच्या उजनी धरणाच्या अचल साठ्यातील पाण्याचा सिंचनासाठी वापर करू नये, या निर्देशाचा आधार घेऊन सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी उजनी जलाशयावरील पुणे जिल्ह्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र देऊन, पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे, असे अंकुश पाडुळे म्हणाले.उजनी धरणात सद्यस्थितीला ४७ टीएमसी पाणी आहे. सोलापूर व पंढरपूर भागात पिण्यासाठी साडेचार टीएमसी सोडले, तरी ४३ टीएमसी पाणी शिल्लक राहते. इंदापूर तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या व जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त दोन ते अडीच टीएमसी पाणी लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत आत्ताची व पुढील दोन महिन्यांतील परिस्थिती अधिक गंभीर आहे. दुष्काळ तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती विभाग प्राधिकरणाचा आदेश कालबाह्य ठरलेला आहे, असे सांगून पाडुळे म्हणाले की, सन २०११-१२ मध्ये ऐन दुष्काळात उजनी धरणात ३८ टक्के पाणीसाठा असतानादेखील पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता, याचा विचार झाला पाहिजे. वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी त्यांनी केली. (वार्ताहर)