शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रकल्पांविरोधात आंदोलन मागे

By admin | Updated: November 28, 2014 00:53 IST

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी लेखी दिल्यानंतर, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी येत्या 1 डिसेंबरपासून पुकारलेले आंदोलन आज मागे घेतले.

पुणो : फुरसुंगी येथे 12 इंची पाइपलाइन आणि 5 एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प  1 डिसेंबर्पयत सुरू  करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी लेखी दिल्यानंतर, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी येत्या 1 डिसेंबरपासून पुकारलेले आंदोलन आज मागे घेतले. 
चार महिन्यांपूर्वी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत दिलेली लेखी आश्वासने महापालिकेने पाळली नसल्याचे या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार विजय शिवतारे यांच्या निदर्शनास आणून देत, बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी तातडीने या ग्रामस्थांची बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर आंदोलन 31 डिसेंबर्पयत पुढे ढकलण्यात आल्याचे आमदार शिवतारे यांनी सांगितले. 
चार महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी फुरसुंगी येथे 12 इंची पाइपलाइन आणि सुमारे 2 वर्षापूर्वी उभारलेला 5 एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प 48 तासांत कार्यान्वित करणो यासह  पाणी योजनेसाठी पालिकेने तत्काळ आपला 16 कोटींचा हिस्सा भरणो, कचरा डेपो बाधितांच्या 64 नातेवाइकांना तत्काळ महापालिका सेवेत घेणो, अशी आश्वासने देण्यात आली होती. यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा दावा करीत ग्रामस्थांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे ही आश्वासने 3क् नोव्हेंबरला पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांनी दिलेली मुदत 1 महिना शिल्लक असली तरी, 1 डिसेंबरपासूनच गाडय़ा अडविण्यात येणार असल्याचा इशारा दिला. 
त्यानंतर गुरुवारी सकाळी याबाबत आयुक्त कुमार यांनी आमदार शिवतारे यांच्यासह ग्रामस्थांची बैठक घेतली, तसेच पाइपलाइन आणि जलशुद्धीकरण प्रकल्प 1 डिसेंबर्पयत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच उर्वरित आश्वासने 31 डिसेंबर्पयत पूृर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे शिवतारे म्हणाले.
 
महापौर घेणार आज बैठक 
दरम्यान, उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित आश्वासनांबाबत महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीही उद्या (शुक्रवारी) महापालिकेत बैठक बोलाविली आहे. या वेळी ग्रामस्थांची बाजू जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि पालिकेचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.