शासनाने पोलीस पदोन्नती प्रक्रियेत असंविधानिकरित्या ८० मागासवर्गीय उमेदवारांऐवजी केवळ २६ उमेदवारांची भरती करत मागासवर्गीय उमेदवारांवर सामाजिक अन्याय केला असून यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, इतर मागासवर्गीय मंत्री गटाची समिती व राज्य सरकारला मुंबई मॅट कोर्टाची नोटीस आलेली असून उद्या २ तारखेला यासंदर्भात सर्वांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे, म्हणून या या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन करीत असल्याचे युवक अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी शहराध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, महिपाल वाघमारे, नीलेश आल्हाट, बसवराज गायकवाड, भगवान गायकवाड, अक्षय गायकवाड, शशिकला वाघमारे, शशिकांत मोरे, संदीप धांडोरे व मतदारसंघातील सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आरक्षित जागांवर खुल्या गटातील उमेदवारांची भरतीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:15 IST