शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडचा सर्व्हे पुढे सरकेना

By admin | Updated: March 23, 2016 01:36 IST

पुण्यासह जिल्ह्यातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रस्तावित रिंगरोडची अडथळ््यांची शर्यंत अजूनही संपत नाही.

पुणे : पुण्यासह जिल्ह्यातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रस्तावित रिंगरोडची अडथळ््यांची शर्यंत अजूनही संपत नाही. सध्या पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम सुरू असून मावळ, मुळशी व खेड या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काही दिवसांपासून ते काम थांबले आहे. यामुळे सुमारे १८ ते २० किलोमीटरचे सर्वेक्षण रखडले असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शासनाने २००७मध्ये रिंगरोडचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या रिंगरोडच्या मार्गाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून मार्गाची आखणी करावी व त्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्याचे आदेश गडकरी यांनी दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने प्रस्तावित रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट एका परदेशी कंपनीला देण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात खेड-शिवापूर येथून वडकी नाला, उरुळी कांचन, केसनंदपर्यंत प्रस्तावित रस्त्याची पाहणी करण्यात आली. तर, दुसऱ्या टप्प्यात लोणीकंद ते पुणे-मुंबई महामार्ग या मार्गाची पाहणी झाली होती. या रस्त्यासाठी किती क्षेत्राचे भूसंपादन करावे लागणार आहे, प्रस्तावित मार्गावर काही बांधकामे आहेत का, अतिक्रमण झाले आहे का, आदी माहिती या वेळी घेण्यात आली. त्यानुसार या प्रस्तावित मार्गाचे सर्वेक्षण करून त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीकडून संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या होत्या. संबंधित कंपनीने त्यानुसार पहिल्या टप्प्याच्या शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम सुरू केले. आतापर्यंत ७५ चौरस किलोमीटर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले; परंतु मावळ, मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्याला विरोध झाल्याने उर्वरित काम थांबले आहे. त्यामुळे किमान १८ ते २० किलोमीटरचे काम रखडले आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षण प्रस्तावित रिंगरोडचे सर्वेक्षण हे ड्रोनद्वारे केले जात आहे. मानवरहित छोट्या विमानातून या मार्गावरील जमिनी, बांधकाम, अतिक्रमणे या सर्व बाबींचा आढावा घेतला जात आहे. सर्वेक्षणासाठी या नव्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे वेळही कमी लागतो व अचूक सर्वेक्षण केले जाते, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली.