शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कात्रजमध्ये डोंगरांची लचकेतोड

By admin | Updated: May 29, 2017 03:08 IST

कात्रज भागातील सर्व अनधिकृत मोठी बांधकामे, टेकडीवरील प्लॉटिंग, डोंगर फोडून उभारलेली अनधिकृत हॉटेल यांच्यावर येत्या काही दिवसांत

लोकमत न्यूज नेटवर्ककात्रज : कात्रज भागातील सर्व अनधिकृत मोठी बांधकामे, टेकडीवरील प्लॉटिंग, डोंगर फोडून उभारलेली अनधिकृत हॉटेल यांच्यावर येत्या काही दिवसांत हातोडा पडणार आहे. सुदामराव बाबर प्रतिष्ठानच्या वतीने अधिकाऱ्यांसह पाहणी करून या भागातील सर्व अनधिकृत टेकडीफोड थांबविण्यात येणार आहे.ऐतिहासिक कात्रजची ओळख म्हणजे कात्रजचा घाट व येथे असलेली डोंगरे. वाढत्या शहरीकरणामुळे व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक प्लॉटिंगवाल्यांनी, बांधकाम व्यावसायिकांनी व हॉटेलचालकांनी या डोंगराची लक्तरे तोडली आहेत. येथील लाखो झाडे तोडून हजारो एकराची डोंगरे फोडली गेलेली आहेत. यापुढे या भागात अनधिकृतपणे होत असलेली ही कामे थांबविली जातील व सध्या जी चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांनी दिला आहे.नमेश बाबर यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी प्रशासनाने आगम टेकडी, कात्रज भागातील अनेक ठिकाणी टेकट्यांवर बांधलेल्या घरांना नोटिसा दिल्यामुळे येथील गरीब नागरिक आमच्याकडे आले होते. त्यांनी सांगितले, की शहरापेक्षा कमी पैशात आम्हाला या ठिकाणी १ गुंठा, दोन गुंठे प्लॉट मिळत असल्यामुळे आम्ही आमच्याजवळची सर्व जमा-पुंजी लावून या ठिकाणी ही जागा विकत घेतली. हे घेताना आम्हाला सांगण्यात आले, की याचे खरेदीखत होते, येथे रस्ते झाले आहेत, ड्रेनेजलाईन आल्या आहेत, लाईट आहे. पिण्याचे पाणी आहे, या भागात अधिकारी कधीच कारवाई करणार नाहीत, अशा भूलथापा देण्यात आल्या. हे घर जर पडले तर आमचा संसार उघड्यावर येणार आहे. जेव्हा आम्ही बांधकाम केले त्यावेळीदेखील काही राजकीय नेत्यांनी आमच्याकडून कारवाई होणार नाही, म्हणून पैसे घेतले. आता आम्हाला नोटिसा आल्या आहेत. ज्यांच्याकडून प्लॉट खरेदी केले ते आता हात वर करीत आहेत.प्रशासनाच्या आर्थिक हितसंबंधामुळेच या भागात अनधिकृत टेकडीफोड, टेकडीवरील प्लॉटिंग, डोंगर फोडून उभारलेली अनधिकृत हॉटेल आदी कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे आम्ही येत्या काळात एक-एक करून थांबवू व गरीब नागरिक या ठिकाणी या टेकडी फोडणाऱ्याच्या जाळ््यात अडकणार नाहीत, यासाठी येथील सर्व अनधिकृत टेकडीवरील प्लॉटिंग बंद करू, अशी माहिती बाबर यांनी दिली. नगरसेविका अमृता बाबर व (कै.) सुदामराव बाबर प्रतिष्ठानच्या वतीने पीमआरडीए, तहसील व पालिका यांना लेखी निवेदन देऊन या भागातील अधिकाऱ्यांसह पाहणी केली जाईल व तातडीने येथील सर्व कारवाई करून कात्रज टेकडी लचकेमुक्त केली जाईल.