शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’ची चाल धिम्या गतीने

By admin | Updated: November 17, 2014 05:05 IST

महापालिकेने पुणेकरांना उत्कृष्ट व जलद नागरी सुविधा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ‘सारथी’ योजना राबविण्याची संकल्पना एक वर्षांपूर्वी मांडली होती.

हणमंत पाटील, पुणेमहापालिकेने पुणेकरांना उत्कृष्ट व जलद नागरी सुविधा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ‘सारथी’ योजना राबविण्याची संकल्पना एक वर्षांपूर्वी मांडली होती. परंतु, विद्यमान स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांना योजनेचा विसर पडल्याने सारथी योजनेचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना आजही नागरी सुविधांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना जलद गतीने नागरी सुविधा देण्यासाठी गतिमान व पारदर्शक प्रशासनाच्या ‘सारथी’ योजनेची पिंपरी-चिंचवड महापालिकेने यशस्वी अंमलबजावणी केली. त्यासाठी महापालिकेतील विविध विभाग संगणकाने जोडून नागरिकांना अॉनलाइन सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे महापालिका व क्षेत्रीय कार्यालयातील हेलपाटे कमी झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सारथीची यशस्वी योजना पुणे महापालिकेत राबविण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी पुढाकार घेतला होता. गेल्या वर्षी तत्कालीन स्थायी समिती सदस्य व अधिकाऱ्यांनी पिंपरी महापालिकेत जाऊन प्रत्यक्ष या योजनेची माहिती घेतली. त्यानुसार संबंधित कंपनीला पुणे महापालिकेत ही योजना राबविण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार महापालिकेतील सर्व विभाग व १५ क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज आॅनलाइन करण्यात येणार होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी व अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया वेगवान व पारदर्शक होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, केंद्र व राज्य शासनाकडूनही ई-गर्व्हनस योजनेअंतर्गत या योजनेला अनुदान प्राप्त होऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या संगणक विभागाने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घेतली. मात्र, स्थायी समितीच्या या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्याविषयी विद्यमान स्थायी समिती पदाधिकाऱ्यांनी त्याचा एकदाही आढावा घेतलेला नाही. त्यामुळे पुणेकरांना महापालिकेत एक दाखल्यासाठी आजही हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र अद्याप बदललेले नाही. (प्रतिनिधी)