हिनाकौसर खान-पिंजार ल्ल पुणेमोठी जाऊ अपत्यहीन... तिच्या पदरात मूल देण्यासाठी लहान सुनेचा लग्नानंतर लगेचच गर्भधारणेसाठी छळ सुरू झाला... यथावकाश तिला मूलही झाले; पण मोठ्या जावेला आई करण्याच्या धांदलीत सासरच्यांनी बाळंतपणाच्या काही तासांतच तिचं जणू काळीजच ओरबाडलं... पहिल्या नाही तर दुसऱ्या बाळाशी तरी आपली नाळ तोडली जाणार नाहीं या आशेने तिने छळ सहन केला. दुसरी मुलगी झाली तर तिलाही हिसकावून किरकोळ निमित्त करून या मातेलाच घराबाहेर काढण्यात आले. आपल्या चिमुरड्यांनी ‘आई’ म्हणत बिलगावं, ही आस घेऊन ती ५ वर्षे न्यायालयात झुरत राहिली अन् अखेर न्यायालयाने तिच्या पदरात दोन्ही अपत्यांचं न्यायदान दिलं. पिंपरी परिसरात राहणारे पूजा व संदीप (नावे बदललेली) यांचे लग्न झाले, त्या वेळी पूजाच्या मोठ्या जावेला अपत्य नव्हते. ती आई होऊ शकणार नव्हती. त्यामुळे पूजाच्या लग्नानंतर लगेचच तिला मुलं व्हावे म्हणून तिला पती व सासऱ्याच्यांची त्रास देण्यास सुरुवात केली. तिला दिवस गेले. तिने मुलाला जन्म दिला आणि बाळंतपणाच्या काही तासांतचं तिचं मुलं मोठ्या जावेला देण्यात आलं. पती व इतर कुटुंबीयांनीही तिच्यावर दबाव आणला, की मूल मोठ्या जावेलाच द्यायचं व त्या बाळाला जवळ घ्यायचं नाही. तिच्या मातृत्वाचा जरासाही विचार न करता ते तिला बाळापासून दूर ठेवू लागले. त्यानंतर पुन्हा तिला दिवस गेले. हे बाळ तरी आपल्याला मिळेल, या आशेवर ती होती. दुसरी मुलगी झाली. सासऱ्यांनी तीही हिसकावून घेतली. एके दिवशी किरकोळ भांडणाचे कारण काढून तिला हाकलून लावले. माहेरची परिस्थिती हलाखीची; त्यामुळे तिला कोणताही आधार मिळेनासा झाला. उपजीविकेसाठी तिने एक इमारातीत साफसफाईचे काम सुरू केले. अखेर चेतना महिला विकास केंद्राच्या सहाय्याने न्यायालयीन लढा देत तिने आपली अपत्य मिळविली. ४ २००९ मध्ये ती कॅम्प येथील चेतना महिला विकास केंद्राकडे आली. त्यांच्या मदतीने तिने मुलांच्या ताबा मिळावा यासाठी त्यांच्यावर खटला दाखल केला. मात्र तेथेही सुरूवातीला संदीप व त्याच्या कुटुंबियांनी दाद दिली नाही.५ वर्ष ती आपल्या मुलांपासून दूर होती आणि एकटीनचे मुलांसाठी हा न्यायालयीन लढा देत होती. ४ अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि न्यायालयाने संदीपला वेगळी खोली घेऊन तिथे पूजा व मुलांना एकत्रित रहावे असा आदेश दिला. तसेच मुले ही दिवसा आईकडे राहतील व आजी आजोबा रात्रीच्या वेळेस त्यांच्याकडे राहू शकतील असेही आदेशात नमूद केले. अशी माहिती चेतना संस्थेच्या प्रमुख अॅड असुंता पारधे यांनी दिली.
आईच्या मायेने न्यायालयही जिंकले...
By admin | Updated: January 7, 2015 00:49 IST