दौंड : ज्या माणसावर आई वडिलांचे आशीर्वाद असतात तो माणूस जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वश्रेष्ठ माणूस असतो. तेव्हा माणसाने नित्यनियमाने आई वडिलांच्या पाया पडून आपली दिनचर्या सुरु करावी तर आई वडिल ात असेर्पयत त्यांची सेवा करावी असे विचार 108 मुनीश्री प्रतीकसागरजी यांनी सत्संग सोहळ्य़ात भाविकांना दिले.
दौंड येथे 108 मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज यांच्या प्रेरणोने सुरु झालेल्या सर्वधर्मीय सत्संग सोहळ्य़ाला मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्ताने भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून फुलांनी व्यासपीठ सजविलेले आहे. तर प्रतिकसागरजी महाराज यांची व्याख्यानासाठी आसनव्यवस्था भव्य कमळाच्या फुलाच्या प्रतिकृतीत करण्यात आली आहे. एकंदरीतच महाराजांचे ‘आई’ या विषयावरील प्रवचन तसेच सवाद्य धार्मिक गीते यामुळे अवघा परिसर दुमदुमला सकाळी आणि सायंकाळी सुरु असलेल्या दोन सत्रतील सत्संगाला मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. सकाळी दीपमळा येथील सुवीरकुंज निवासस्थानातून प्रतीकसागरजी महाराज यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाराजांचे आगमन सत्संग मैदानावर झाले. यावेळी सुशील शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन पूजन झाले. सीमा शहा यांनी मंगलचरण गायिले त्यानंतर तुषार दोशी आणि सुधीर साने यांनी मनोगत व्यक्त केले.
महावीर वागजकर, संदीप वागजकर, शैलेश वागजकर यांनी शांतीसागर महाराज यांच्या फोटोचे अनावरण केले. दीपप्रज्वलनानंतर प्रतीक सागरजी महाराज यांचे पूजन स्वप्निल शहा, पूजा शहा यांनी केले. तर प्रदीप शहा, ब्रम्हा शहा यांनी मंगलकलश स्थापन केला.
सुनील शहा, चित्र शहा यांनी महाराजांना शास्त्रभेट दिली तर शांतीकुमार शहा, प्रताप लुंड, बबनजी सरनोत यांनी महाराजांना श्रीफळ समर्पित केले. शेवटी प्रेमसुख कटारिया यांच्यासह सर्वधर्म सत्संग सोहळा कमिटीच्या वतीने महाराजांची आरती करण्यात आली.
यावेळी दत्तोजी शिणोलकर, अॅड. विलास बर्वे, गणोश पवार, श्याम वाघमारे, अंबादास मुळे, राजू ओझा, राजू गजधने, सुनील पवार, तन्मय पवार, अशोक गायकवाड, रामेश्वर मंत्री, बुवा सावंत, अॅड. सुधीर गटण, वैभव टाटिया, हरेश ओझा, प्रशात पवार, अशोजी बंब, अशोक
जगदाळे, प्रमोद खांगळ, यांच्यासह भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)
आज विद्यार्थी संस्कार शिबिर
बुधवार (दि.12) रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यार्थी संस्कार शिबिर होणार आहे. तर याच दिवशी सत्संगच्या पहिल्या सत्रत सकाळी 8.30 वाजता ‘प्रेम’ संकल्पनेवर प्रतीकसागरजी महाराज भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.