शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमधून सर्वाधिक नगरसेवक

By admin | Updated: September 8, 2016 02:02 IST

महापालिकेच्या निवडणूक विभागाने ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करून त्याचा आराखडा

पुणे : महापालिकेच्या निवडणूक विभागाने ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करून त्याचा आराखडा आज (बुधवारी) विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे सादर केला. शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार हडपसरमधील नगरसेवकांची संख्या वाढली. तेथून सर्वाधिक २८ नगरसेवक पालिकेत येणार आहेत. हडपसर, वडगावशेरी व खडकवासला मतदारसंघातून एकूण दहा नगरसेवकांची संख्या वाढली आहे.निवडणूक विभागाने केलेल्या प्रभागांच्या प्रारूप आराखड्याची विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून छाननी केली जाणार आहे. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार झाला ना याची तपासणी या समितीकडून केली जाणार आहे. त्याकरिता या समितीला केवळ ५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. १२ सप्टेंबरच्या आत त्यांना हा आराखडा निवडणूक आयोगापुढे सादर करायचा आहे. निवडणूक आयोगाकडून तो २३ सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी जाहीर केला जाईल.शहराच्या २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार प्रभागांची रचना पाडण्यात येणार आहे. २०११ साली शहराची लोकसंख्या ३१ लाख २४ हजार ४५८ इतकी नोंदविण्यात आली आहे. वाढलेल्या लोकसंख्येनुसार शहरातील नगरसेवकांची संख्या १० ने वाढणार आहे. हे दहा नगरसेवक कोणत्या भागातून वाढणार याची मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती.वाढलेल्या लोकसंख्येनुसार हडपसर, वडगाव शेरी व खडकवासला मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या वाढली़ तर कसबा मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या कमी झाली़ साधारणत: एक प्रभाग ७० ते ८० हजार लोकसंख्येचा असणार आहे.त्या भागातील वाढलेल्या महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता १५२ वरून १६२ वर पोहोचली आहे. त्यामध्ये ४ सदस्यांचे ३९ व ३ सदस्यांचे २ अशा एकूण ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. महापालिकेतील नगरसेवकांच्या सध्या असलेल्या १५२ च्या संख्येत १० ने वाढ झाली असून, १६२ जागांकरिता निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ४ सदस्यांचे ३९ व ३ सदस्यांचे २ अशी एकूण ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. प्रभागरचनेला उत्तर दिशेकडून सुरुवात करण्यात येऊन त्यानंतर पूर्वेला वळावे, पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि शेवट दक्षिण दिशेला करण्यात यावा, प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता राखावी, वस्त्यांचे दोन वेगवेगळ्या प्रभागांत विभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी, आदी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निकषांचे पालन प्रभागरचना तयार करताना करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)