शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग

By admin | Updated: July 27, 2016 03:57 IST

इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जादा वर्ग

पुणे : इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जादा वर्ग घेण्यात येणार आहे. हे वर्ग दि. २७ जुलै ते १३ आॅगस्ट या कालावधीत सहा महाविद्यालयांमध्ये होणारआहेत. विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीच हे वर्ग घेतले जाणार आहेत. अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये ७३ हजार ८१९ विद्यार्थ्यांना प्रवेश अ‍ॅलॉट करण्यात आले. त्यापैकी ५२ हजार २४४ विद्यार्थ्यांनीच संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. उर्वरित २१ हजार विद्यार्थ्यांसह अद्याप आॅनलाइन प्रवेश अर्ज न भरलेले, लांबचे महाविद्यालय मिळालेले, शाखा बदल, माध्यम बदल अशा तक्रारी असणारे हजारो विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. अकरावीचे वर्ग काही दिवसांपूर्वीच सुरू झालेले असल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. हे विचारात घेऊन प्रवेश समितीने संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जादा वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सहा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेतले जाणार आहेत. दि. २७ जुलै ते १३ आॅगस्ट यादरम्यान विज्ञान व वाणिज्य शाखेचे वर्ग प्रत्येकी तीन महाविद्यालयांतील होतील. याबाबत संबंधित महाविद्यालयांना संबंधित विषयाचे शिक्षक, वर्गखोल्या व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच वर्गांचे वेळापत्रक तयार करावे, अशा सूचना विभागीय शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी संबंधित महाविद्यालयांना दिल्या आहेत.(प्रतिनिधी)कला शाखेला वगळलेविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीने जागा वर्ग घेण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यातून कला शाखा वगळण्यात आली आहे. केवळ विज्ञान व वाणिज्य शाखेचे वर्गच घेतले जाणार आहेत. याविषयी बोलताना दिनकर टेमकर म्हणाले, प्रवेशापासून वंचित राहिलेले बहुतेक विद्यार्थी विज्ञान व वाणिज्य शाखेचे आहेत. तसेच या शाखांचा अभ्यासक्रम तांत्रिक असतो. कला शाखेचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यात फारशी अडचण येणार नाही. त्यामुळे कला शाखा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.जादा वर्ग होणारी महाविद्यालयेमहाविद्यालयशाखासर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणेविज्ञानमॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, पुणेवाणिज्यएस. एम. जोशी कनिष्ठ महाविद्यालय, हडपसरविज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय, हडपसरवाणिज्यश्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डीविज्ञानजयहिंद कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरी वाणिज्य