शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीचा मासिक २ टक्के दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 03:55 IST

महापालिकेच्या मिळकत कराची (घरपट्टी) पहिल्या २ महिन्यांची सवलत संपल्यानंतर लगेचच आता पहिल्या सहामाहीसाठीचा मासिक २ टक्के दंड आकारणे सुरू होणार आहे.

पुणे : महापालिकेच्या मिळकत कराची (घरपट्टी) पहिल्या २ महिन्यांची सवलत संपल्यानंतर लगेचच आता पहिल्या सहामाहीसाठीचा मासिक २ टक्के दंड आकारणे सुरू होणार आहे. त्यापुढच्या सहा महिन्यांसाठीही पहिला महिना संपताच लगेचच मासिक २ टक्के दंड आकारण्यास सुरूवात केली जाते. सावकारी टक्क्यांपेक्षाही ही टक्केवारी जास्त असल्याची टीका यावरून केली जात असते.महापालिकेकडून आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान वर्षासाठी म्हणून मिळकत कर आकारला जातो. शहरात अशा नोंदणीकृत मालमत्तांची संख्या ८ लाख ४२ हजार इतकी आहे. दोन सहामाहीत ही कर आकारणी केली जाते.पहिल्या सहा महिन्यातील एप्रिल व मे या दोन महिन्यात कर जमा केला तर सुरूवातीला १० टक्के व नंतर ५ टक्के सवलत करपात्र रकमेवर दिली जाते. हे दोन महिने पुर्ण झाल्यानंतर पुढच्या ४ महिन्यांसाठी दरमहा २ टक्के या दराने दंडआकारणी कराच्या रकमेवर केली जाते. या सहा महिन्याच्या अखेरीस कर जमा केला तर करदात्याला केवळ विलंबापोटी मुळ रकमेवर एकूण ८ टक्के दंड जमा करावा लागतो.हीच पद्धत दुसऱ्या सहा महिन्यांसाठीही वापरली जाते. त्यात पहिल्या सहा महिन्यांचे पैसे जमा केले नाही तर त्याचा पुढील महिन्यांसाठीही २ टक्के दंड आकारला जातोच शिवाय दुसºया सहा महिन्यांचा कर थकवला तर त्यावरही लगेचच (विहित मुदतीनंतर) २ टक्के दंडाची आकारणी सुरू होते. या पद्धतीमुळे कर थकवला तर करदात्याला वर्षाअखेरीस किमान १० ते १२ टक्के दंड जमा करावा लागतो. दंड आकारणीच्या या पद्धतीमुळे थकलेल्या कराची रक्कम एकदम फुगत जाते व करदात्याला अखेरीस एकूण रक्कम जमा करणे अशक्य होते.जून महिन्यापासून ही दरमहा २ टक्के दंड आकारणी सुरू होणार असल्याने सर्व करदात्यांनी त्वरीतकर जमा करावा असे आवाहन महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने करण्यातआले आहे.