शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

केरळला होणार ३१ मेला मॉन्सूनचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मे महिन्याच्या मध्याला नेहमीच सर्वांचे लक्ष मॉन्सून कधी येणार याकडे लागले असते. हवामान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मे महिन्याच्या मध्याला नेहमीच सर्वांचे लक्ष मॉन्सून कधी येणार याकडे लागले असते. हवामान विभागाने एक सुखद वार्ता आज दिली आहे. केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले आहे. मॉन्सूनच्या आगमनात चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केले आहे.

सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळवर होत आले आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने १ जून रोजी मॉन्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्याचे ५ जून रोजी आगमन झाले होते. हवामान विभागाकडून दरवर्षी १५ मे रोजी मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाविषयीचा अंदाज जाहीर करण्यात येतो. यंदा तो १४ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचे वारे हे २१ मेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंदमान समुद्रात २२ मे रोजी मॉन्सून स्थिरावेल. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळ आले असल्याने मॉन्सूनच्या आगमनाला बळकटी येणार आहे.

गेल्या पाच वर्षांतील हवामान विभागाने मॉन्सूनचा केरळमधील आगमनाची तारीख व प्रत्यक्षात केरळमध्ये दाखल झालेल्याची तारीख

वर्षप्रत्यक्षात दाखलहवामान विभागाचा अंदाज

२०१६ ८ जून ७ जून

२०१७ ३० मे ३०मे

२०१८ २९ मे २९ मे

२०१९८ जून६ जून

२०२० ५ जून१ जून