शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणे हटवणार

By admin | Updated: May 7, 2017 02:29 IST

आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांतील २३ गावांमध्ये लोकशासन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे वनजमिनीवर

लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांतील २३ गावांमध्ये लोकशासन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे वनजमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी वन, महसूल, पोलीस विभाग यांचा एकत्रित कृती अराखडा तयार केला जाईल व पावसाळ्यापूर्वी ही सर्व अतिक्रमणे काढली जातील, असा निर्णय खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उपस्थित लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.लोकशासन आंदोलकांनी वनजमिनीवर केलेले अतिक्रमण व २ जुलै रोजी ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम या विषयांवर लांडेवाडी येथे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, सुनील गाडे, सहायक उपवनसंरक्षक डी. जे. घाडगे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वनक्षेत्रपाल योगेश महाजन, प्रजोद पालवे, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले, तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर आदी उपस्थित होते.काही लोकांनी बेकायदेशीरपणे चळवळ उभारून वनजमिनींचा ताबा घेतला आहे. या लोकांनी ३ तालुक्यांतील २०० एकरांपेक्षा जास्त जमिनींचा ताबा घेऊन झाडे तोडली, जमिनीचे सपाटीकरण केले आहे. याकडे शासनाचे लक्ष नसून, ही बाब केंद्र व राज्य सरकारांनी गांभीर्याने घ्यावी, यासाठी खासदार आढळराव-पाटील यांनी लोकसभेतही आवाज उठवला आहे.ही अतिक्रमणे काढण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. वन, महसूल, पोलीस या विभागांनी कायदेशीररीत्या या लोकांना बाहेर काढण्यासाठी कृती अराखडा तयार करावा व पावसाळ्यापूर्वी या जागा मोकळया कराव्यात, अशी सूचना आढळराव-पाटील यांनी दिली. त्याप्रमाणे कृती अराखडा तयार करण्याचे ठरले असून, त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली जाणार आहे. जुन्नर : साडेतीन लाख झाडे लावणार२ जुलै रोजी राज्यात ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. यापैकी जुन्नर वन विभागात ३ लाख ६६ हजार झाडे लावली जाणार असून, आंबेगाव तालुक्यात १ लाख ३८ हजार झाडे लावली जाणार आहेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांबरोबर ग्रामस्थांनीदेखील यामध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावे, यासाठी गावोगावी हा कार्यक्रम पोहोचवला जाणार असल्याचे अर्जुन म्हसे-पाटील यांनी सांगितले. तसेच, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या ८ मे रोजी असलेल्या वाढदिवशी एक हजार झाडे लावली जाणार आहेत. यापैकी ६१ झाडे खासदारांच्या हस्तेलावण्यात येणार असल्याचे रवींद्र करंजखिले यांनी सांगितले.