शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी आणखी पुढे वाटचाल केली असून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी आणखी पुढे वाटचाल केली असून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून साधारणपणे १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पोहचतो. यंदा त्याने ५ दिवस अगोदर महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून आज सुरत, नंदुरबार, बेतुल, मंडला, बिलासपूर, बोलांगीर, पुरीपर्यंत पोहचला आहे.

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र कायम असल्याने महाराष्ट्रातील कोकण, तसेच गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. कोकणात पुढील चार दिवस तसेच विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये येलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत मुंबई (सांताक्रूझ) २३०, बेलापूर १७०, पनवेल १६०, उल्हासनगर १५०, कल्याण १४०, माथेरान १२०, भिवंडी, पालघर, उरण, वसई ११०, अंबरनाथ, रोहा १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रातील धुळे ९०, महाबेळश्वर ५०, ओझरखेडा ४०, एरंडोल, वेल्हे २० मिमी पाऊस झाला.

मराठवाड्यातील परभणी ७०, अंबड, परतूर ६०, परळी वैजनाथ ५० मिमी पाऊस झाला.

विदर्भातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. घाटमाथ्यावरील लोणावळा (टाटा) १५०, ताम्हिणी ९०, डुंगरवाडी ८०, शिरगाव ७०, दावडी, खोपोली ६०, कोयना(पोफळी), अम्बोणे, वळवण, भिरा येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी दिवसभरात सांताक्रूझ ४७, कुलाबा १०, डहाणू ६१, महाबळेश्वर ९, चंद्रपूर १२, अमरावती २६, गोंदिया १०, वर्धा ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.

किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती कायम असल्याने पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील चार दिवस येलो अ‍ॅलर्ट देण्यात आला असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी १२, १३ व १४ जूनला हवामान विभागाने येलो अ‍ॅलर्ट दिला आहे. या जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भात आता मॉन्सून पोहचला असून, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील द्रोणीय स्थिती याचा एकत्रित परिणाम होऊन विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये येलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण व विदर्भात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.