शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाची ओळख पटली

By admin | Updated: April 12, 2016 04:24 IST

कुरकुंभ येथे ५० कोटींचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू मांत्रिक बाबाची अखेर ओळख पटण्यास पोलिसांना यश आले आहे. त्याचे रेखाचित्र तयार झाले असून लवकरच त्याला अटक केली जाईल

दौंड : कुरकुंभ येथे ५० कोटींचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू मांत्रिक बाबाची अखेर ओळख पटण्यास पोलिसांना यश आले आहे. त्याचे रेखाचित्र तयार झाले असून लवकरच त्याला अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.अशोक सिंग असे त्याचे नाव असून, त्याच्या चेल्याचे नाव जावेद आहे. ८ मार्चच्या मध्यरात्री कुरकुंभ येथील एका बंद पडलेल्या निर्जन ठिकाणच्या हॉटेलमध्ये संबंधित भोंदू मांत्रिक बाबाने आर्थिक लूटमार करून चारही बांधकाम व्यावसायिकांना मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात लोकमतने ९ मार्च रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने एकच खळबळ उडाली होती. ‘५० कोटी रुपयांचा पाऊस पाडतो’ या आमिषाला बळी पडलेल्या चौघांना या भोंदू महाराजाने पुण्याहून येताना गाडीतच पेढे खायला देऊन त्यांच्यावर भूल टाकण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पुढे आली आहे. कुरकुंभला आल्यानंतर या भोंदू महाराजाचे पितळ उघडे पडल्यावर त्याच्यासह त्याच्या शिष्याने पलायन केले होते. बेशुद्ध पडलेल्या चौघांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सोहेले खान व त्यांचे बंधू अकील खान यांनी तातडीने दौंडच्या पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये आणल्याने व वेळीच त्यांच्यावर उपचार झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.पोलीस या दोन्ही भोंदू महाराजांचा शोध घेत आहेत; मात्र महाराजाच्या आमिषाला बळी पडलेलेदेखील पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे समजते. (वार्ताहर)शुद्धीवर आल्यानंतर या चौघांनीही दौंड पोलिसांना घडलेली माहिती दिली, तर यातील दोघांचे जबाब घेण्यात आले असल्याचे समजते. या चौघांपैकी एक चित्रकार असल्याने व त्याने भोंदू मात्रिकाला प्रत्यक्ष पाहिले असल्यामुळे या भोंदू महाराजाचे रेखाचित्र पोलिसांना प्राप्त झाले आहे.