शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा काढण्यासाठी मोजावे लागतात पैसे

By admin | Updated: November 17, 2016 02:24 IST

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका वगळता इतर तहसील कार्यालयातील महाराष्ट्र जमीन महसूल भूमी अभिलेख विभागात लाभार्थ्यांकडून सातबारा उतारा काढण्यासाठी अनधिकृतपणे जादा पैसे घेतले जात असल्याची तक्रार

शेलपिंपळगाव : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका वगळता इतर तहसील कार्यालयातील महाराष्ट्र जमीन महसूल भूमी अभिलेख विभागात लाभार्थ्यांकडून सातबारा उतारा काढण्यासाठी अनधिकृतपणे जादा पैसे घेतले जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. त्याविरोधात येत्या २२ नोव्हेंबरला भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटनेच्या वतीने खेड येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व घंटानाद करणार आहे. सातबारा उतारे प्रमाणित प्रतीवर संपूर्ण एकत्रित जमिनीच्या प्रत्येक प्रतीस ग्रामीण क्षेत्रासाठी पाच रुपये सुधारित शुल्क घेण्याबाबतची सुनावणी लोकआयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या हजेरीत झाली असता, हा आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांसाठी बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील फक्त हवेली तालुका वगळता इतर तालुक्यांतील जमीन महसूल भूमी अभिलेख कक्षातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचा चक्क केराची टोपली दाखवली जात आहे. खेड तहसील कार्यालयाच्या भूमी अभिलेख कक्षात अर्जदारांकडून सातबारा प्रतिपान ५० ते १५० रुपयांपर्यंत घेतले जात आहे. त्याची सरकारी लेखी पावती दिली जात नाही. अर्जदारांकडून झेरॉक्स तसेच अन्य कारणांसाठी हजारो रुपये अनधिकृतपणे उकळले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.