शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील निष्कीय खात्याचा डाटा मिळवून अब्जावधींची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्कीय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्कीय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह ८ जणांना अटक केली आहे. भाजपाचा चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष व अभिनेते रवींद्र मंकणी यांचा पुत्र रोहन मंकणी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

रोहन रवींद्र मंकणी (वय ३७, रा. सहकारनगर), रवींद्र माशाळकर (वय ३४, रा. लातूर), मुकेश मोरे (वय ३७, रा. येरवडा), राजशेखर ममीडा (वय ३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय ४५, रा. वाशीम, सध्या औरंगाबाद), आत्माराम कदम (वय ३४, रा. मुलुंड, मुंबई), वरुण वर्मा (वय ३७, रा. मेरठ, उत्तरप्रदेश) आणि विकासचंद यादव (वय २५, रा. जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय ५४, रा. आनंदनगर, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय ४२, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर अशा ५ बँकेतील डोरमंट खात्याचा डेटा मिळविला. या सर्व बँक खात्यात जवळपास २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. ही माहिती चोरल्यावर ते एका व्यक्तीला विकणार होते. त्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. गेले काही दिवस सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाईटस येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना मिळाली. बातमीची खातजमा करुन पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळात तेथे एका कारमधून एक तरुण आला. त्यानंतर काही वेळाने आणखी पाच पुरुष व एक महिला आली. पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपयांची शिल्ल्क असलेल्या बँक खात्यांचा डाटा मिळाला. रोहन रवींद्र मंकणी याने हा डाटा घेऊन पैसे देणारी व्यक्ती सिंहगड रोडवर राहणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस सिंहगड रोडवरील इमारतीत गेले. तेथे रोहन मंकणी याने सुधीर शांतीलाल भटेवरा हा पैसे देणार आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. या सर्वांकडून ११ मोबाईल फोन, रोख २५ लाख रुपये, २ कार व एक मोपेड असा तब्बल ४३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार वाघचौवरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, महादेव कुंभार, उपनिरीक्षक सागर पडवळ, अमित गोरे, अनिल डफळ, अंमलदार संदेश कर्णे, नितेश शेलार, प्रसाद पोतदार, नितिन चांदणे, अनिल पुंडलिक, शुभांगी मालुसरे, ज्योती दिवाणे या पथकाने केली.