शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल डान्सबारमध्ये राऊतने उडविले पैसे

By admin | Updated: December 30, 2014 00:02 IST

न्यायालयातील निलंबित वरिष्ठ लिपीक दीपक राऊत याने बनावट जामिनासाठी घेतलेले ३ लाख रुपये पनवेल येथील डान्सबारमध्ये उडविले असल्याची कबुली दिली आहे.

पुणे : न्यायालयातील निलंबित वरिष्ठ लिपीक दीपक राऊत याने बनावट जामिनासाठी घेतलेले ३ लाख रुपये पनवेल येथील डान्सबारमध्ये उडविले असल्याची कबुली दिली आहे. तसेच, काही भाग त्याने मित्रांना दिला असल्याचे सांगत आहे. याबाबत पनवेल येथे जाऊन तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. पी. बावस्कर यांनी राऊतची १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. भिलारेवाडी ग्रामपंचायतीचा उपसरपंच संतोष धनवडे (वय ३६, रा. भिलारेवाडी, ता. हवेली) यांचा १ फेब्रुवारी २०१३ रोजी खून झाला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांनी प्रवीण विष्णू भिलारे (वय २७, रा. भिलारेवाडी, ता. हवेली) याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. त्यापैकी प्रवीण भिलारे याने जामीन मिळविण्यासाठी केलेला अर्ज तत्कालीन सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर भिलारे याने न्यायालयातील वरिष्ठ लिपीक दीपक राऊत याच्याशी हातमिळवणी केली. जामीन मिळाल्याचा सत्र न्यायालयाचा आदेश घेतला व १ डिसेंबरला येरवडा कारागृहाबाहेर आला होता. राऊतची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. राऊतने भिलारे याच्याकडून ३ लाख रुपये घेतल्याचे कबूल केले आहे. पनवेल येथील डान्सबारमध्ये रक्कम उडविली असल्याची त्याने माहिती दिली आहे. ४भिलारे याच्या कोणकोणत्या नातेवाइकांनी व मित्रांनी मदत केली आहे. न्यायालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कामाला असताना त्याने मोठ्या स्वरूपात रक्कम घेऊन न्यायालयाचे बनावट जामीन आदेश तयार केले. याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची सरकारी वकील रजनी तहसीलदार यांनी विनंती केली, ती न्यायालयाने मान्य केली.