शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र नगरसेवकांकडून मानधन वसुली

By admin | Updated: December 25, 2015 01:59 IST

पद तर गेलेच पण त्याचबरोबर त्या पदामुळे मिळालेले मानधनही द्यावे लागण्याची वेळ दोन माजी नगरसेवकांवर आली. नगरसेवक असताना त्यांनी स्वीकारलेले मानधन पालिका

पुणे : पद तर गेलेच पण त्याचबरोबर त्या पदामुळे मिळालेले मानधनही द्यावे लागण्याची वेळ दोन माजी नगरसेवकांवर आली. नगरसेवक असताना त्यांनी स्वीकारलेले मानधन पालिका प्रशासनाने त्यांच्याकडून वसूल केले. निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही वसुलीची कारवाई करण्यात आली.कल्पना बहिरट व भरत चौधरी अशी मानधन वसूल करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. अशा अपात्र ठरलेल्या नगरसेवकांकडून मानधन वसूल करण्याचा प्रकार पालिकेकडून प्रथमच झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या अपात्रतेची दखल घेत त्यांना दिलेल्या मानधनाची वसुली करा, असा आदेश पालिका प्रशासनाला दिला . त्याप्रमाणे बहिरट यांच्याकडून ८२ हजार ३८८ तर चौधरी यांच्याकडून ३ लाख १८ हजार ९३ रुपयांची वसुली करण्यात आली. यात मानधनाबरोबरच सभांच्या उपस्थितीसाठी मिळणाऱ्या भत्त्याचाही समावेश आहे.बहिरट या सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मंगळवार पेठ येथील प्रभाग क्रमांक ४० अ मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर लगेचच त्यांच्यावर जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप होऊन न्यायालयात तक्रार दाखल झाली होती. तिथे झालेल्या सुनावणीत त्यांचा दाखला बनावट असल्याचे सिद्ध झाले व एका वर्षातच त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले. भरत चौधरी कोंढवा खुर्द येथून प्रभाग क्रमांक ६३ अ मधून निवडून आले होते. त्यांचे जातीने कुणबी असल्याबाबतचे प्रमाणपत्र खोटे असल्याबाबत न्यायालयात तक्रार दाखल झाली. सुनावणीअंती हे प्रमाणपत्रही बनावटच असल्याचे सिद्ध होऊन त्यांचेही नगरसेवक पद रद्द झालेपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी न्यायालयाच्या निकालाप्रमाणे दोघांचेही नगरसेवक पद रद्द केले. निवडणूक आयोगाने या निकालाची दखल घेतली व या दोघांनी नगरसेवकपदाच्या कालावधीत पालिकेकडून स्वीकारलेले मानधन व भत्ते त्यांच्याकडून वसूल करा, असा आदेश पालिका प्रशासनाला दिला. यापूर्वीच्या पंचवार्षिकमध्येही काही नगरसेवकांचे पद जात प्रमाणपत्र खोटे आढळल्यामुळे रद्द झाले आहे. मात्र त्यांच्याबाबतीत असा मानधन वसुलीचा निर्णय झालेला नव्हता. या दोघांशिवाय प्रिया गदादे, बापू कांबळे व विजय देशमुख या तिघांचेही पद न्यायालयाच्या निर्णयाने रद्द झाले आहे. यातील प्रिया गदादे पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाल्या. कांबळे यांनी त्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. देशमुख यांच्याबाबत प्रशासनाला आयोगाने अद्याप काहीही कळवलेले नाही.