शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

शासकीय कर्करोग रुग्णालयाला मिळेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून रुग्ण येतात. कर्करोगाच्या उपचारांसाठी ससून रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू झाला असला ...

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून रुग्ण येतात. कर्करोगाच्या उपचारांसाठी ससून रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू झाला असला तरी कर्करोगासाठी प्रस्तावित असलेले स्वतंत्र रुग्णालय सहा वर्षांपासून रखडलेले आहे. जागेचा प्रश्न अद्याप न सुटल्याने कर्करोग रुग्णालयाला मुहूर्त कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

कर्करोग रुग्णांना उपचार मिळणे आणखी सुलभ व्हावे, यासाठी पुण्यात शासकीय कर्करोग रुग्णालय उभारले जाण्याचा प्रस्ताव सात-आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या ससून रुग्णालयात कर्करोगाच्या तपासण्या, शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीचे उपचार केले जातात. मात्र, रेडिओथेरपीसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. कर्करोगाशी संबंधित सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली निर्माण व्हाव्यात, यासाठी २०१२ पासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप कर्करोग रुग्णालयाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकलेले नाही.

शवाघराच्या समोरच्या जागा निश्चित करण्यासंबंधी चर्चा अजूनही सुरूच आहे. हा सव्वा दोन एकरचा भूखंड एमएसआरडीसीचा आहे, त्यांच्याशी जागेसंबंधी बोलणी सुरू आहेत. या भूखंडाच्या बदल्यात ससूनची येरवडा येथील मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूटची जागा एमएसआरडीसीला देण्याबाबत बोलणी सुरू आहेत. मात्र, याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही यश आलेले नाही, अशी माहिती ससूनमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

--

कर्करोग रुग्णालयाबाबत जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. रुग्णालय प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय